विहिरीचे अनुदान रखडले; शेतक-याने मागितली इच्छामरणाची परवानगी
By Admin | Updated: December 23, 2015 02:39 IST2015-12-23T02:39:53+5:302015-12-23T02:39:53+5:30
जिल्हाधिका-यांना दिले निवेदन; दोषींवर कारवाईची मागणी.

विहिरीचे अनुदान रखडले; शेतक-याने मागितली इच्छामरणाची परवानगी
संजय सपकाळ / लोहारी (मुंडगाव): विहिरीचे अनुदान रखडल्याने मुंडगाव येथील दारिद्रय़रेषेखालील अल्पभूधारक शेतकरी सावतराम सरकटे यांनी जिल्हाधिकार्यांना शुक्रवारी सादर केलेल्या निवेदनात इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. याबाबत दोषींवर कारवाई करण्याची मागणीदेखील केली आहे. मुंडगाव येथील दारिद्रय़रेषेखालील अल्पभूधारक शेतकरी सावतराम सरकटे यांच्याकडे अमिनापूर शेतशिवारामध्ये ८२ आर शेतजमीन आहे. त्यांनी सन २0११-१२ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर विहिरीच्या खोदकामाला प्रारंभ केला; मात्र त्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही. यासंदर्भात त्यांनी अधिकारी-कर्मचार्यांकडे पाठपुरावा केला; मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. अखेर त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकार्यांकडे धाव घेऊन इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी केली. याबाबत बीडीओंशी संपर्क होऊ शकला नाही.