Dr. Punjabrav Deshmukh Agricultural University has a Memorandum of Understanding with industry in Hyderabad | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा हैद्राबाद येथील उद्योगासोबत सामंजस्य करार

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा हैद्राबाद येथील उद्योगासोबत सामंजस्य करार

अकोला: कृषी प्रक्रिया यंत्राचा विस्तार करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हैद्राबाद येथील एका उद्योगासोबत सामंजस्य करार केला. ही प्रक्रिया केंद्रे शेतकऱ्यांपर्यंत पोहोेचण्यासाठी कृषी विद्यापीठाने या अगोदरही अनेक कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने अनेक शेतीपयोगी तसेच प्रक्रिया यंत्र विकसित केली आहेत. या यंत्राचा विस्तार होऊन शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग उभारावेत, शेतकरी गटांना मदत व्हावी, या उद्देशाने कृषी विद्यापीठाचे काम सुरू आहे. ११ सप्टेंबर रोजी कृषी विद्यापीठातील सभागृहात कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एम.बी. नागदेवे, डॉ. प्रदीप ए. बोरकर व उद्योगाकडून कृष्णकुमार एम. हेमसुंदर डी यांनी करारावर स्वाक्षरी करू न यंत्राच्या विस्तारासाठीचे कृषी विद्यापीठाने आणखी एक पाऊल टाकले. याप्रसंगी डॉ. बोरकर यांनी हैद्राबाद येथील उद्योग राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. नागदेवे यांनी कृषी प्रक्रिया उद्योगास चालना देण्याकरिता कृषी विद्यापीठ कटिबद्ध असल्यानेच शेतकºयांना व त्यांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी व्ह्यल्यूअ‍ॅग्रो सारख्या समूहासोबत करार केला असल्याचे सांगितले. कृष्णकुमार यांनी व्ह्यल्यूअ‍ॅग्रो हा एक नवीन कृषी व्यवसाय असून, शेतकरी, ग्रामीण जनतेला अन्नप्रक्रिया उत्पादन करण्यास प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले. कृषी प्रक्रिया केंद्र तयार करण्यासाठी आम्ही तत्पर असून, शेतकरी गटांसोबत कराम करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. या क्षेत्रात प्रक्रिया उद्योग यंत्राच्या खरेदीसाठी आर्थिक सहायदेखील करण्यात येते.
यावेळी सुशील सक्कलवार, मोहिनी डांगे, व्ही.डी. मोहड,आर.डी. बिसेन, डी.आर. धुमाले,जी.जे. घावट, संकेत खंदारे, डी.बी. घावघावे, पी.एच. सोळंके, नीलेश राठोड, संतोष मानकर, जनार्दन निंबाळकर, अविनाश देशमुख इत्यादींची उपस्थिती होती.
फोटो-

 

Web Title: Dr. Punjabrav Deshmukh Agricultural University has a Memorandum of Understanding with industry in Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.