‘डॉ. हेडगेवार’ शाळेतील विद्यार्थ्यांचा ‘युरेका. युरेका.’

By Admin | Updated: December 12, 2014 23:55 IST2014-12-12T23:55:29+5:302014-12-12T23:55:29+5:30

अँल्युमिनियम ऑक्साईड नष्ट करण्यासाठी शोधला पर्याय

'Dr. Hedgewar 'School students' Eureka Eureka. ' | ‘डॉ. हेडगेवार’ शाळेतील विद्यार्थ्यांचा ‘युरेका. युरेका.’

‘डॉ. हेडगेवार’ शाळेतील विद्यार्थ्यांचा ‘युरेका. युरेका.’

राम देशपांडे / अकोला

अँल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये वारंवार अन्नपदार्थ शिजविल्यामुळे मानवी शरिरास घातक ठरणारा अँल्युमिनिय ऑक्साईडचा थर तयार होतो. तो पूर्णत: स्वच्छ करण्यासाठी डॉ. हेडगेवार माध्यमिक शाळेच्या ९ व्या वर्गातील विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून पालकापासून अँटी ऑक्साईडची निर्मिती केली आहे. अँल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये वारंवार अन्नपदार्थ शिजविल्याने होणार्‍या रासायनिक अभिक्रियेमुळे भांड्याच्या आतील भागात अँल्युमिनियम ऑक्साईडचा थर जमा होतो. मानवी शरिरास अत्यंत घातक ठरणार्‍या या रासायनिक पदार्थाच्या सेवनामुळे अस्थमा, टीबी, दमा, वातरोग, तोंडाचा अल्सर, अन्ननलीकेतील आजार तसेच कँसर देखील होऊ शकतो. अवघ्या आयुष्यात कधीही मद्यप्राशन, धुम्रपान, किंवा तंबाखु सेवन न करणार्‍यांना देखील कँसर झाल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. शरिरास घातक ठरणार्‍या अशा रासायनिक द्रव्यांच्या नकळत सेवनामुळेच असे दुर्धर आजार जडत असतील कदाचित. विशेषत: अँल्युमिनियमची भांडी स्वच्छ करण्यासाठी अद्यापतरी बाजारपेठेत कुठलाच साबण, पेस्ट वा पावडर उपलब्ध नाही. लिंबु किंवा सोडा देखील त्यावर पूर्णत: गुणकारी ठरत नाही. अशा स्थितीत डॉ. हेडगेवार माध्यमिक शाळेच्या ९ व्या वर्गात शिकणार्‍या अभिराम कुळकर्णी, मंदार जोशी, ज़्षीकेष थोरात, शुभम भटकर यांनी रसायन शास्त्राच्या शिक्षिका रेवती अयाचित-पांडे यांच्या सहाय्याने कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून एक रामबाण ईलाज शोधुन काढला आहे.

Web Title: 'Dr. Hedgewar 'School students' Eureka Eureka. '