डॉ. पंदेकृविचा शेतीपूरक उद्योग उभारण्यावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 04:55 PM2020-05-29T16:55:40+5:302020-05-29T16:55:56+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अ‍ॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.

Dr. Emphasis on setting up agri-supplementary industry Dr. PDKV Akola | डॉ. पंदेकृविचा शेतीपूरक उद्योग उभारण्यावर भर!

डॉ. पंदेकृविचा शेतीपूरक उद्योग उभारण्यावर भर!

googlenewsNext

अकोला : शेतीपूरक उद्योगाला चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला अ‍ॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटर मिळाले आहे. येथे तरुणांना प्रशिक्षण, प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कृषी व शेतकरी केंद्र सरकारच्या कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय कृषी विकास योजनांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अ‍ॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अ‍ॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटर (राबी) महाराष्ट्रातील युवकांसाठी एक सुवर्णसंधी घेऊन आले आहे. केंद्र सरकारच्या दृष्टिकोनातून शेतीतून येणाऱ्या उत्पन्नासोबतच शेतीपूरक उद्योगाला चालना देणे, कृषी क्षेत्रात तरुणांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव देऊन त्यांचे उद्योगात रूपांतर करून व्यवसाय निर्मितीला चालना देण्यासाठी या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येईल.
या केंद्रांतर्गत नवउद्योजक व युवकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामधे नव्याने कृषी व कृषी आधारित उद्योग सुरुवात करण्यासाठी प्री-सीड स्टेज फंडिंग प्रोग्राम व असलेल्या उत्पादन, सेवा या उद्योगात रूपांतरित करण्यासाठी सीड स्टेज फंडिंग प्रोग्रामचे आयोजन केले असून, या कार्यक्रमांतर्गत नवउद्योजक व युवकांना मार्गदर्शन केले जाईल. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट कृषी व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योगात रूपांतरित करण्यासाठी प्रशिक्षण देऊन ५ लाखांपर्यंतचे आर्थिक साहाय्य पुरविणे तसेच कृषी क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या उत्पादनांसाठी २५ लाखांपर्यंतचे आर्थिक साहाय्य पुरविणे असे आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या नवउद्योजकांना अ‍ॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटरतर्फे आठ आठवड्यांचे प्रशिक्षण, विशेष तज्ज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन, औद्योगिक आधार, उत्कृष्ट तांत्रिक मार्गदर्शन, इनक्युबेशन सुविधा, पायाभूत सुविधा, कृषी व व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन या सुविधा पुरविण्यात येतील.
ही योजना मुख्य अन्वेषकचे डॉ. एस.जे. गहूकर हे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, डॉ. पी. जी. इंगोले अधिष्ठाता (कृषी) डॉ. पंदेकृवि, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली राबवित सह-अन्वेषक ए. एन. पासलावार, सह-अन्वेषक गुप्ता यासाठी सहकार्य करीत आहेत.

Web Title: Dr. Emphasis on setting up agri-supplementary industry Dr. PDKV Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.