शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विभाजनावर तोडगा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 16:10 IST

अकोला: केवळ भात संशोधनसाठी वेगळे विद्यापीठ कशाला, असा मतप्रवाह असल्याने सिंदेवाही येथील भात संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी शासनाने १७ कोटी रुपयांचा निधी दिला असून, मूल येथे नवीन कृषी महाविद्यालयही देण्यात आले आहे.

अकोला: केवळ भात संशोधनसाठी वेगळे विद्यापीठ कशाला, असा मतप्रवाह असल्याने सिंदेवाही येथील भात संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी शासनाने १७ कोटी रुपयांचा निधी दिला असून, मूल येथे नवीन कृषी महाविद्यालयही देण्यात आले आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विभाजनावर हा तोडगा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकक्षेत विदर्भ असून, विदर्भातील या कृषी विद्यापीठाने अनेक महत्त्वाचे धान्य वाण संशोधन, तंत्रज्ञान विकसित करू न हरित क्रांतीला हातभार लावला आहे; परंतु तत्कालीन आघाडी शासनाने या कृषी विद्यापीठासह अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा जोतिबा कृषी विद्यापीठाचे विभाजन करण्यावर भर दिला होता. यासाठी समितीही स्थापन करण्यात आली होती. समितीने विभाजनाचा अनुकूल अहवाल दिला होता.आघाडी शासनानंतर आलेल्या युती शासनानेही याबाबत समिती स्थापन केली होती. या समितीनेही विभाजनाच्या बाजूने अहवाल दिला; पण या भागातील तज्ज्ञांच्या मते केवळ भात पिकासाठी वेगळे विद्यापीठ देणे संयुक्तिक नाही. विदर्भातील ४९ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ३२ हजार हेक्टरवर शेती पश्चिम विदर्भात आहे. वर्धा व लगतच्या जिल्हे सोडले तर चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी हे विद्यापीठ असेल, या दोन जिल्ह्यात भात पीक आहे. म्हणूनच भात पिकासाठी वेगळे विद्यापीठ कशाला, असाही मतप्रवाह समोर आला आहे. याच कृषी विद्यापीठातंर्गत सिंदेवाही येथील भात संशोधन केंद्राने १० च्यावर वाण विकसित केले आहे.दरम्यान, शासनाने १७ कोटी निधी दिला असून, मूल येथे कृषी महाविद्यालयही होत आहे. तसेच अकोला येथील ऊस संशोधन केंद्र पूर्व विदर्भात हलविण्यात आले असून, नागपूर जिल्ह्यातील एकार्जुना केंद्राला ४ कोटी दिले आहेत. येथे जैव खते (बायो फर्टिलाझर) व रोपवाटिका विकसित करण्यात येणार आहे. यामुळेच विभाजनाचा विषय मागे पडला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

- सिंदेवाहीचे भात संशोधन केंद्र बळकटीकरणासाठी १७ कोटी मिळाले आहेत. एकार्जुना केंद्रालाही ४ कोटी मिळाले आहेत. भात संशोधन केंद्रावर अगोदरपासूनच कृषी विद्यापीठाचे लक्ष आहे. यापुढेही राहील.डॉ. व्ही.एम. भाले,कुलगुरू ,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ