डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST2021-04-15T04:18:02+5:302021-04-15T04:18:02+5:30

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असून, रक्ताची गरज आहे. त्यामुळे शासनाने रक्तदात्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले होते. ...

Dr. Blood donation camp on the occasion of Babasaheb Ambedkar's birthday | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असून, रक्ताची गरज आहे. त्यामुळे शासनाने रक्तदात्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून डाॅ. पंकज साबळे, निंबा फाटा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन दीपक साबळे यांनी केले. शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी भाजपा अध्यक्ष अमोल साबळे, सरपंच संदीप वाघोडे, संदीप साबळे, अनिल अंभोरे, प्रमोद वाघोडे, अनिल इंगळे, सुनील वानखेडे, अजय इंगळे, सिद्धार्थ तायडे आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी विपुल माने छत्रपती प्रतिष्ठान व साई जीवन रक्तपेढीच्या वैद्यकीय चमूचे सहकार्य लाभले.

Web Title: Dr. Blood donation camp on the occasion of Babasaheb Ambedkar's birthday