शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

‘डीपीआर’ रखडला; मनपाचे घनकचरा व्यवस्थापन कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 12:33 IST

अकोला: कचऱ्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या प्रकल्प अहवालात (डीपीआर) नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी त्रुटी काढल्याने घनकचरा व्यवस्थापनाचा मुद्दा लांबणीवर गेला आहे.

अकोला: कचऱ्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या प्रकल्प अहवालात (डीपीआर) नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी त्रुटी काढल्याने घनकचरा व्यवस्थापनाचा मुद्दा लांबणीवर गेला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील ‘कचरा लाख मोलाचा’ मोहिमेकडे महापालिकेने पाठ फिरविल्यामुळे सदर डीपीआरला तातडीने मंजुरी मिळणे आवश्यक झाले आहे. यामुळे ‘डीपीआर’च्या संदर्भात नगर विकास विभागाच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१५ ते २०१७ या कालावधीत महापालिकांच्या स्तरावर नागरिकांचा शोध घेऊन त्यांना वैयक्तिक स्तरावर शौचालय बांधून देण्याची मोहीम पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाने शहरात निर्माण होणाºया कचºयाचे ओला व सुका असे विलगीकरण करण्यासाठी मे २०१७ पासून ‘कचरा लाख मोलाचा’ मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. कचºयाचे विलगीकरण न केल्यास महापालिकांचे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेऊन शासनाने यासाठी ३० जून अंतिम मुदत दिली होती. यादरम्यान घनकचरा व्यवस्थापनासाठी परिपूर्ण असा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करा, त्यानंतरच कचरा व्यवस्थापनासाठी निधीला मान्यता देण्याची भूमिका शासनाने घेतली. त्यानुषंगाने महापालिका व नगर परिषदांनी ‘डीपीआर’ तयार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या.शासनाने केली ‘मार्स’ची नियुक्तीकचºयावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य शासनाने प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी अमरावती विभागासाठी ‘मार्स प्लॅनिंग अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रा. लिमिटेड अहमदाबाद’ या संस्थेकडे सोपविली. ‘मार्स’ने तयार केलेल्या ‘डीपीआर’मध्ये काही महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्याचे निर्देश नगर विकास विभागाने दिले आहेत.तांत्रिक समितीची हवी मंजुरी!‘मार्स’ संस्थेने तयार केलेला डीपीआर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सादर करण्यात आला होता. त्यावेळी मजीप्राने त्रुटी काढल्याने हा अहवाल रखडला होता. संस्थेने त्रुटी दूर केल्यानंतर मजीप्राने डीपीआरला तांत्रिक मंजुरी दिली. या प्रकल्प अहवालाला राज्य शासनाच्या तांत्रिक समितीची मंजुरी गरजेची आहे. ३० नोव्हेंबर रोजी नगर विकास विभागात पार पडलेल्या बैठकीत डीपीआरमध्ये काही सूचनांचा समावेश करून आठवडाभरात बैठकीचे आयोजन केले जाणार होते. ही बैठक लांबणीवर गेल्यामुळे डीपीआरची मंजुरीसुद्धा रखडल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका