शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

डाळ, तेल, बेसनचे भाव घसरल्याने फराळ ‘गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:14 IST

ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळ, तेल आणि बेसनचे भाव घसरल्याने यंदा दिवाळीचा फराळ स्वस्त होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही साखरेची मागणी वाढली असून, दिवाळीच्या निमित्ताने २0 ट्रक अतिरिक्त साखर विक्रीला जाणार असल्याचा अंदाज होलसेल किराणा बाजारातील व्यापार्‍यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देदिवाळीत फस्त करणार अकोलेकर ३२0 टन साखर किराणा बाजारात तेजी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळ, तेल आणि बेसनचे भाव घसरल्याने यंदा दिवाळीचा फराळ स्वस्त होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही साखरेची मागणी वाढली असून, दिवाळीच्या निमित्ताने २0 ट्रक अतिरिक्त साखर विक्रीला जाणार असल्याचा अंदाज होलसेल किराणा बाजारातील व्यापार्‍यांनी व्यक्त केला आहे.दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक गोड पदार्थ तयार करण्यासाठी साखरेची आवश्यकता असते, त्यामुळे दरवर्षी दिवाळीत साखरेची विक्रमी विक्री होत असते. बाजारपेठेतील मागणीचा अंदाज बांधून पश्‍चिम महाराष्ट्रातून अकोल्यातील किराणा बाजारात शेकडो टन साखर दाखल झाली आहे. या दहा दिवसात किमान २0 ट्रक साखर अकोलेकर फस्त करणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिवाळीचा फराळ साखर आणि बेसनाशिवाय तयार होत नाही. त्यामुळे गरिबातील गरीब व्यक्ती साखर, डाळ आणि बेसनाची खरेदी केल्याशिवाय राहत नाही. दरम्यान, ऐन दिवाळीच्या निमित्ताने सोयाबीन तेल, खोबरा, वनस्पती तूप, बेसनचे दर स्वस्त झाले आहेत तर गुड, साखर, मैदा, रव्याचे दर स्थिरावले असल्याने किराणा बाजारात गर्दी वाढली आहे. पोहा, मुरमुरे, शेंगदाण्याची मागणीही वाढली आहे. जीएसटीमुळे बाजारपेठेत मंदी आली होती. दिवाळीच्या निमित्ताने बाजारात तेजी येईल, अशी अपेक्षा होती. ती अपेक्षा आता पूर्ण होत आहे. ऐन दिवाळीच्या निमित्ताने फराळ गोड होत असल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.

 १२ चाकी  ट्रकमध्ये १६ टन साखरेचे पोते बसतात. २0 ट्रक साखर अकोल्यात येत असल्याने ३२0 टन साखर अकोलेकर दिवाळीत फस्त करणार आहेत. साखरेची आकडेवारी दिवसागणिक वाढत जात असल्याचेही जाणकारांचे मत आहे. मिठाई, लाडू, रसमलाई, अनारसे, करंजी, पेढा, बरफी, श्रीखंड, गुलाबजाम, रसगुल्ले आदी सर्व पदार्थ साखरेशिवाय तयारच होत नाहीत.

मैदा- ३६, रवा-३६, साखर-४२, बेसन ९५ ते १0८ , तेल ७२ ते ८0 आणि वनस्पती तूप ७५ ते ९५ रुपये किलोच्या दराने विक्रीला आहे. किराणा खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांनी बाजारात गर्दी केली असून, बाजारात तेजी येत आहे.-गोपाल शर्मा, गोपाल सुपर बाजार,अकोला.

टॅग्स :diwaliदिवाळी