गणेश मंडळांना देणग्या

By Admin | Updated: September 3, 2014 22:26 IST2014-09-03T22:26:01+5:302014-09-03T22:26:22+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांमध्ये गणेश मंडळांना देणग्या देण्याची स्पर्धा रंगली.

Donation to Ganesh Mandals | गणेश मंडळांना देणग्या

गणेश मंडळांना देणग्या

बुलडाणा : विधानसभा मतदारसंघाच्या तिकिटासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांना यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रचारासाठी आयतीच संधी मिळाली. तिकिटासाठी पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावणार्‍या इच्छुकांनी गणेश मंडळांवर लाखोंच्या देणग्यांची उधळण सुरू केली आहे. यातही सर्वाधिक जास्त रकमेची देणगी देण्यासाठी जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे.
निवडणूक कोणतीही असो, पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची ऊठबैस व धावपळीमुळे वातावरणात चैतन्य निर्माण करते. इच्छुक उमेदवारही या वेळी (फक्त निवडणुकीतच) कार्यकर्त्यांची मोठय़ा आस्थेने विचारपूस करतात आणि वेळोवेळी आर्थिक रसदही पुरवतात. विधानसभा निवडणुकीचे तिकीट आपल्याच पारड्यात पडणार, या अपेक्षेतून राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार गणेशभक्तांसाठी सरसावले आहेत.
गणेश मंडळांसाठी चक्क लाखोंच्या देणग्यांचे वाटप केल्या जात आहे. देणगी वाटपाचा हा ह्यफिव्हरह्ण खामगाव, बुलडाणा मतदारसंघात जास्त प्रमाणात असल्याची माहिती आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश भक्तांना जोडण्यासाठी इच्छुक उमेदवार अक्षरश: पाण्यासारखा पैसा ओतत आहेत. इच्छुकांचा हा फंडा कितपत यशस्वी ठरतो, याचे चित्र आगामी दिवसात लवकरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Donation to Ganesh Mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.