रक्तदान, प्लाझ्मा दान करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:13 IST2021-05-03T04:13:09+5:302021-05-03T04:13:09+5:30

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावेळी महापौर अर्चनाताई मसने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ...

Donate blood, donate plasma | रक्तदान, प्लाझ्मा दान करा

रक्तदान, प्लाझ्मा दान करा

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावेळी महापौर अर्चनाताई मसने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण तसेच प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

............

नितीनकुमार डोंगरे यांचा सत्कार

अकोला : माहिती व जनसंपर्क विभागातील नितीनकुमार डोंगरे यांच्या निवृत्तीनिमित्त पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, गाडवे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, माहिती सहायक सतीश बगमारे, कॅमेरामन चंद्रकांत पाटील, हबीब शेख, लिपिक वर्षा मसने, रोनिओ ऑपरेटर सुनील टोमे उपस्थित हाेते.

...............

Web Title: Donate blood, donate plasma