दस्तावेज बनावट, नातेवाईकही बोगस!

By Admin | Updated: December 16, 2015 02:11 IST2015-12-16T02:11:50+5:302015-12-16T02:11:50+5:30

किडनी तस्करी प्रकरणातील आरोपीस रविवारपर्यंत कोठडी.

Documentary texture, relatives, bogus! | दस्तावेज बनावट, नातेवाईकही बोगस!

दस्तावेज बनावट, नातेवाईकही बोगस!

अकोला: किडनी तस्करी प्रकरणामध्ये आरोपींनी केलेल्या हेराफेरीचे नवनवीने किस्से समोर येत आहेत. तस्करांनी हेरलेल्या लोकांच्या किडन्या विकत घेण्यासाठी काही गरजुंनी नातेवाईक मुंबई, पुण्यात असल्याचे दाखविण्यात आले असून, त्यासाठी मोठय़ा प्रमाणात बोगस दस्तावेज तयार करण्यात आले आहेत. किडनी तस्करी प्रकरणाचा सुत्रधार शिवाजी महादेव कोळी याच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २0 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्याचा साथीदार देवेंद्र सिरसाटची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. शिवाजी कोळीला घेऊन स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचे पथक मुंबईहून मंगळवारी अकोल्यात आले. दुपारी त्याला प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी.व्ही. हरणे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. शिवाजी कोळीने गरजू रुग्णांना किडनी देण्यासाठी त्यांचे मुंबई, पुणे येथे नातेवाईक असल्याचे बनावट दस्तावेज तयार केले आणि त्याआधारे किडनी खरेदी व विक्रीचे व्यवहार केले. अकोला शहरासोबतच, राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्येसुद्धा किडनी देणार्‍यांसह किडनी खरेदी करणारेही असू शकतात. त्यामुळे शिवाजी कोळीला २0 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत देण्याची मागणी यावेळी पोलिसांनी केली. पोलीस कोठडीच्या मागणीला आरोपीच्या विधिज्ञांनी विरोध केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने शिवाजी कोळीला २0 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील विजय पंचोली यांनी, तर आरोपींतर्फे अँड. सुमेध वानखडे, अँड. संतोष इंगळे, अँड. अमित डांगे, अँड. एम.बी. शर्मा यांनी बाजू मांडली.

Web Title: Documentary texture, relatives, bogus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.