दुचाकीला धडक दिल्यानंतर डॉक्टरला मारहाण
By नितिन गव्हाळे | Updated: September 24, 2022 17:16 IST2022-09-24T17:16:09+5:302022-09-24T17:16:09+5:30
दुचाकीने जाणाऱ्या डॉक्टरने रस्त्यावर वळण घेताना हात दाखविल्यानंतरही मागाहून येणाऱ्या भरधाव दुचाकी चालकाने धडक दिल्यानंतर डॉक्टरसोबतच वाद घातला.

दुचाकीला धडक दिल्यानंतर डॉक्टरला मारहाण
अकोला:
दुचाकीने जाणाऱ्या डॉक्टरने रस्त्यावर वळण घेताना हात दाखविल्यानंतरही मागाहून येणाऱ्या भरधाव दुचाकी चालकाने धडक दिल्यानंतर डॉक्टरसोबतच वाद घातला. शिवीगाळ करत, डॉक्टर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी दुचाकीस्वाराविरूद्ध गुन्हा दाखल केला.
एका ४१ वर्षीय डॉक्टरच्या तक्रारीनुसार ते खासगी हॉस्पीटलमध्ये हृदयरोग तज्ज्ञ म्हणून काम करतात. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ते हॉस्पीटलमध्ये जाण्यासाठी राम नगरातून निघाले असता, वळणावर हात दाखविल्यानंतरही त्यांच्या दुचाकीला एमएच ३०, ३९९९ क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिली. त्यानंतर त्या दुचाकीस्वाराने डॉक्टरला अश्लिल शिवीगाळ करीत, मारहाण केली. डॉक्टरच्या तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनी भादंवि कलम २९४, ३२५ नुसार गुन्हा दाखल केला.