अकोला : जुने शहरातील डाबकी रोड परिसरात चक्क आठ-आठ तास अघोषित भारनियमन केले जात असल्याने नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत तांत्रिक सबब पुढे करून भारनियमन के ले जात असेल, तर हा सरकारला बदनाम करण्याचा कुटिल डाव खपवून घेणार नसल्याचे सांगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी शुक्रवारी महावितरणच्या अधिकार्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. ऐन सणासुदीच्या दिवसांत महावितरण कंपनीने शहरात अघोषित भारनियमन सुरू केले असल्यामुळे अकोलेकर त्रस्त झाले आहेत. जुने शहरातील डाबकी रोड भागात तांत्रिक सबब पुढे करून दिवसांतून दोन वेळा भारनियमन केले जात आहे. या प्रकाराला कंटाळलेल्या नागरिकांनी आमदार गोवर्धन शर्मा यांची भेट घेतली असता आ. शर्मा यांनी महावितरणचे कार्यालय गाठले. ठोस कारण नसताना सणासुदीच्या दिवसांत भारनियमन करून नागरिकांना वेठीस धरणे बंद करा, अन्यथा जनक्षोभ निर्माण झाल्यास तुम्हीच जबाबदार राहणार असल्याचा इशारा आ. शर्मा यांनी अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांना दिला. नागरिकांना नाहक वेठीस धरून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी आ. गोवर्धन शर्मा यांनी केला. काही तांत्रिक बिघाड असेल, तर तो तातडीने दूर केला जाईल, असे अधीक्षक अभियंता दोडके यांनी स्पष्ट केले. यावेळी महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, नगरसेवक सतीश ढगे, अनिल गरड, संजय जिरापुरे, सुनील क्षीरसागर, अमोल गोगे, तुषार भिरड, रमण पाटील, सिद्धार्थ शर्मा, नीलेश निनोरे, रामदास सरोदे, सचिन मुदिराज, वसंता मानकर, रमेश अलकरी, श्याम घाटे, श्याम विंचनकार, नगरसेविका नंदा पाटील, रंजना विंचनकार, मंगला म्हैसने, दिलीप मिश्रा, सुनील बाठे, गजानन धानोकर, संजय देशमुख, बबलू पळसपगार, सूरज शेळके, सुनील पाटील, डॉ. संजय ढोरे, राजेश तिवारी, गोपाळ शर्मा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारला बदनाम करू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:40 IST
अकोला : जुने शहरातील डाबकी रोड परिसरात चक्क आठ-आठ तास अघोषित भारनियमन केले जात असल्याने नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत तांत्रिक सबब पुढे करून भारनियमन के ले जात असेल, तर हा सरकारला बदनाम करण्याचा कुटिल डाव खपवून घेणार नसल्याचे सांगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी शुक्रवारी महावितरणच्या अधिकार्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
सरकारला बदनाम करू नका!
ठळक मुद्देजुने शहरात भारनियमनआ. गोवर्धन शर्मा यांचा महावितरणला इशारा