अन्य जातींना आदिवासी जमातीमध्ये स्थान देऊ नका
By Admin | Updated: August 4, 2014 23:06 IST2014-08-04T23:06:59+5:302014-08-04T23:06:59+5:30
बुलडाणा : जिल्हा आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचा धडक मोर्चा

अन्य जातींना आदिवासी जमातीमध्ये स्थान देऊ नका
बुलडाणा : आदिवासी आरक्षणातील घुसखोरी सारख्या घटनाबाह्या प्रकाराचा निषेध व्यक्त करून अन्य जातींना आदिवासी जमातीमध्ये स्थान देऊ नका यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीतर्फे आज ४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा गांधी भवन येथून जयस्तंभ चौक, आठवडी बाजार, कारंजा चौक, स्टेटबँक मार्गावरून जिल्हाधिकारी कार्याल्यावर धडकला. यावेळी आपल्या विविध प्रलंबित मागण्याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात आदिवासी जमातीमध्ये अन्य जातींचा समावेश करू नये, १५ जून १९९५ चा जी.आर. सक्तीने राबवावा, आदिवासींना राहती जागा कायम करून ८ अ द्यावा, आदिवासींना अतिक्रमणधारकांना वर्षाची कोणतीही अट न लावता तात्काळ जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे द्यावे, प्रत्येक तहसील कार्यालयात आदिवासींसाठी स्वतंत्र मदत केंद्र परवानगी द्यावी, जिल्हातील खर्या आदिवासींना आश्रम शाळेचे पालकत्व द्यावे, आदिवासी कर्मचार्यांवर होणारे अन्याय त्वरित थांबवून त्यांना सेवेत सरळ भरती करून द्यावी, आदी मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमलेल्या हजारों आदिवासी बांधवांना वरिष्ठांनी मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेस कमिटी आदिवासी विभागाचे अध्यक्ष दिलीप मोरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भास्करराव ठाकरे, कैलास चवरे, नितीन मसराम, सिकंदर बागुल, विनोद डाबेराव, वासुदेव खुळे, बागुल, दुर्योधन गायकवाड, गजानन डाबेराव, सुखदेव डाबेराव, डॉ.टापरे, ज्ञानेश्वर चिभडे, रत्नाताई मोरे, प्रिमीला डाबेराव, र्यारेलाल डाबेराव, वासुदेव खुळे, नंदिनी टारपे, दुर्योधन गायकवाड, जनार्धन मोरे, अरूण बरडे, पंजाबराव पवार, प्रकाश गायकवाड, गजानन सोळंके, सुखदेव डाबेराव, श्रीकृष्ण बरडे, हरी बरडे, भगवान कोकाटे, ज्ञानेश्वर राठोड, ज्ञानेश्वर सोळंके, नवल माळवे, भास्कर पिंपळे, गजानन सोळंके, गणसिंग चांगड, भगवान सोळंके आदी समाज बांधव उपस्थित होते.