डीएलएडच्या जागा ६९ हजार; अर्ज मात्र दोन हजारावर!

By Admin | Updated: July 26, 2016 01:50 IST2016-07-26T01:50:52+5:302016-07-26T01:50:52+5:30

डीएलएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांंनी फिरविली पाठ.

DLAD seats 69 thousand; The application is only two thousand! | डीएलएडच्या जागा ६९ हजार; अर्ज मात्र दोन हजारावर!

डीएलएडच्या जागा ६९ हजार; अर्ज मात्र दोन हजारावर!

नितीन गव्हाळे/अकोला
सात ते आठ वर्षांंपूर्वी डीएलएडला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांंची झुंबड उडायची. प्रथम श्रेणीतील गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यालाही डीएड प्रवेशासाठी संघर्ष करावा लागत असे. प्रयत्न करूनही विद्यार्थ्यांंला डीएडला प्रवेश मिळणे कठीण होते; परंतु अलीकडच्या काही वर्षांंमध्ये डीएलएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांंच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. राज्यात डीएलएडच्या ६९ हजार जागा आहेत; मात्र दोन हजारावरच विद्यार्थ्यांंनी ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे यंदाही ६0 हजाराच्या जवळपास डीएलएड जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
शिक्षणाचे झालेले बाजारीकरण, शासनाने बंद केलेली शिक्षक भरती, शिक्षक पदाच्या पात्रतेसाठी सुरू केलेली टीईटी परीक्षा, शाळेत शिक्षक म्हणून लागण्यासाठी द्यावे लागणारे लाखो रुपयांचे डोनेशन आदी प्रकारांमुळे विद्यार्थी व पालकांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविली. एकेकाळी शिक्षकी पेशाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होता. डीएड केल्यानंतर शिक्षक म्हणून नोकरी मिळते, अशी युवकांची धारणा होती; परंतु अलीकडच्या काही वर्षांंमध्ये ही धारणा पार लयास गेली. राज्यातील हजारो शाळांमध्ये लाखो शिक्षकांची रिक्त असलेली पदे, शिक्षकांचे समायोजन, विद्यार्थी संख्या कॉन्व्हेंट संस्कृती आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळल्यामुळे शिक्षकी पेशाचे महत्त्वच कमी झाले. शिक्षक म्हणून नोकरी मिळणेच दुरापास्त झाले. ज्यांनी डीएडसारखा अभ्यासक्रम पूर्ण केला, अशा विद्यार्थ्यांंंना तीन ते पाच हजार रुपये मानधनावर कॉन्व्हेंट शाळाही ठेवायला तयार नाहीत. त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थ्यांंमध्ये उदासीनता निर्माण झाली. सध्या डीएलएड प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ३0 जुलैपर्यंंंत प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. राज्यात डीएलएडच्या ६९ हजार जागा आहेत; मात्र अद्यापपर्यंंंत राज्यात केवळ २ हजार ९८0 विद्यार्थ्यांंंनी डीएलएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अर्ज केले आहे. दरवर्षी या संख्येत घट होत आहे. अनेक जिल्हय़ातील अध्यापक महाविद्यालये तर विद्यार्थी संख्येअभावी बंद पडली आहे.
विभागनिहाय प्राप्त झालेले डीएलएडचे प्रवेश अर्ज
मुंबई-              २७५
पुणे-              ३२२
नाशिक-          ७३0
कोल्हापूर-       ३१६
औरंगाबाद-      ५४८
अमरावती-     ३0३
नागपूर-         ४४६
कोकण-          ४0
.............
एकूण-          २९८0

Web Title: DLAD seats 69 thousand; The application is only two thousand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.