शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

दिव्यांग आर्ट गॅलरी स्वीकारणार पूरग्रस्त अनाथांचे शैक्षणिक पालकत्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 16:23 IST

पूरग्रस्त अनाथांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा संकल्प दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे करण्यात आला आहे.

अकोला : गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘दृष्टी गणेशा’ या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून पूरग्रस्त अनाथांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा संकल्प दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे करण्यात आला आहे. गतवर्षी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, रक्तदान यासह विविध सामाजिक विषयांवर दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे जनजागृती करण्यात आली होती.दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे गत पाच वर्षांपासून गणेशोत्सवात ‘दृष्टी गणेशा’ या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. गतवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये या कार्यक्रमांतर्गत रक्तदान, अवयवदान, पर्यावरण रक्षण, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ आदी सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यात आली होती. यंदाही या विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे. सोबतच कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्त अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा संकल्प दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे करण्यात आला आहे. याशिवाय, दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे दरवर्षी १०० दिव्यांग बांधवांना शिष्यवृत्ती देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ‘दृष्टी गणेशा’ या कार्यक्रमात दिव्यांग आर्ट गॅलरीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विशाल कोरडे हे आपल्या चमूसह संगीताच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांची जनजागृती करतील. कार्यक्रमात प्रा. विशाल कोरडे, प्रा. अरविंद देव, प्रा. गजानन मानकर, नितीन खंडारे, माधुरी तायडे, पूर्वा धुमाळे, स्वाती मेश्राम, गौरी शेंगोकार, शीतल रायबोले, मयूरी सुळे, मनोहर काळे, प्रसन्ना तापी, अनुप तायडे, शशांक जहागीरदार इत्यादी कलावंत आपले संगीतमय प्रदर्शन करणार आहेत. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजेश बोंडे, डॉ. सतीश उटांगळे, दंत तज्ज्ञ डॉ. विद्या जयस्वाल, धनंजय भगत, अक्षय राऊत, शिवाजी भोसले, दिव्यांग आर्ट गॅलरीचे गजानन भांबुरकर, प्रसाद झाडे, जानवी राठोड, श्रीकांत तळोकार, तृप्ती भाटिया, स्मिता अग्रवाल, भारती शेंडे, डॉ. संजय तिडके व प्रा. सोनल कामे परिश्रम घेत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाKolhapur Floodकोल्हापूर पूर