‘नरेगा’ कामांचे जिल्हानिहाय नियोजन लवकरच!
By Admin | Updated: March 30, 2017 20:35 IST2017-03-30T20:35:02+5:302017-03-30T20:35:02+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) राज्यातील जिल्हानिहाय कामांचे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे.

‘नरेगा’ कामांचे जिल्हानिहाय नियोजन लवकरच!
निधी आणि अपेक्षित मजूर उपस्थितीचा समावेश
संतोष येलकर/अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) राज्यातील जिल्हानिहाय कामांचे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील सर्वच जिल्हय़ांत प्राधान्याने करावयाच्या कामांसह उपलब्ध होणारा निधी आणि कामांसाठी अपेक्षित मजूर उपस्थितीचा समावेश राहणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २0१७-१८ या वर्षात करावयाच्या कामांचे राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात तयार करण्यात आलेले आराखडे जिल्हा परिषदांच्या मंजुरीनंतर संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयांकडे सादर करण्यात आले. या आराखड्यांच्या आधारे राज्यातील रोहयो कामांचा वार्षिक आराखडा तयार करण्यात आला असून, राज्याच्या आराखड्यास नुकतीच केंद्र शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील सर्वच जिल्हय़ांत सन २0१७-१८ या वर्षात प्राधान्याने करावयाची कामे, त्यासाठी उपलब्ध होणारा निधी, कामांसाठी अपेक्षित मजुरांची उपस्थिती आणि मजुरांना विहित कालावधी मजुरीचे वाटप यासंदर्भात जिल्हानिहाय रोहयो कामांचे नियोजन पुढील आठवड्यात राज्य ह्यनरेगाह्ण आयुक्त कार्यालयामार्फत निश्चित करण्यात येणार आहे. रोहयो अंतर्गत जिल्हानिहाय कामांचे नियोजन मंजूर झाल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात यावर्षीच्या नियोजनानुसार कामे सुरू करण्यात येणार आहेत.
ह्यनरेगाह्ण अंतर्गत राज्यातील कामांच्या आराखड्यास केंद्र शासनाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार राज्यातील जिल्हानिहाय कामांचे नियोजन, निधीची तरतूद याबाबतची माहिती पुढील आठवड्यात राज्यातील सर्वच जिल्हय़ांत रोहयो शाखांना देण्यात येणार आहे.
-अभय महाजन,
राज्य आयुक्त, ह्यनरेगाह्ण, नागपूर.