पाणीटंचाईने जिल्हा होरपळतोय!
By Admin | Updated: April 17, 2016 01:09 IST2016-04-17T01:09:31+5:302016-04-17T01:09:31+5:30
गतवर्षीच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ: नागरिकांची पायपीट.

पाणीटंचाईने जिल्हा होरपळतोय!
वाशिम: एप्रिल महिन्यातील पंधरवड्याला सुरुवात होत नाही, तोच पाणीटंचाईने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. प्रशासनातर्फे तात्पुरत्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू असली, तरी ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील ह्यहंडाह्ण मात्र कायम असल्याचे चित्र आहे. पर्यावरणाचा र्हास, विविध प्रकारच्या प्रदूषणांमधील वाढ व अन्य काही कारणांमुळे ऋतूमानात बदल होत आहे. पूर्वीच्या तुलनेत गत तीन वर्षांत पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढत आहे. गतवर्षी पावसाळ्यात पावसाने सरासरी गाठली नाही. परिणामी, आ ता पाणीटंचाईची दाहकता अधिकच वाढत असल्याचे दिसून येते. उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या चटक्याने ग्रामीण भागातील जनता होरपळून जात आहे. २0१५ च्या उन्हाळ्यात जिल्हा प्रशासनाने ४३९ गावे पाणीटंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली होती. याच वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील २00 गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली. या कामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी ह्यपाण्याह्णसारखा ओतण्यात आला. त्यामुळे साहजिकच २0१६ च्या उन्हाळ्यात पाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट अपेक्षित होती; मात्र प्रत्यक्षात पाणीेटंचाईग्रस्त गावांच्या यादीत १२२ गावांची भर पडली आहे. त्यामुळे जलयुक्त अभियानांतर्गतच्या कामांचा दर्जा प्रकर्षाने समोर येत आहे. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले, त्यापैकी निम्यापेक्षा अधिक गावे प्रशासनानेच संभाव्य पाणीटंचाईग्रस्त म्हणून कृती आराखड्यात समाविष्ठ केलेली आहेत. चालू वर्षात पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यात ५६१ गावे पाणीटंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेली आहेत. या गावांमध्ये तात्पुरत्या उपाययोजनांसाठी ५ कोटी ६८ लाख ३४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. यामधून ४१७ विहीर अधिग्रहण, ८१ टँकर, ४३ नळ योजनांची दुरूस्ती, सात तात्पुरत्या नळ योजना, १0५ नवीन बोअर वेल आदी उपाययोजना आहे त. जिल्हा प्रशासनाने १५३ विहिरी अधिग्रहित केल्या असून, ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कृती आराखड्यात समाविष्ठ नसलेल्या गावांमध्येही पाणीटंचाईने तीव्र स्वरूप धारण केले आहे. शिरपूर जैन परिसरातील पांगरखेडा, किन्ही घोडमोड, खंडाळा, बोराळा, मालेगाव तालुक्यातील मेडशी, काळाकामठा, रिधोरा, वाशिम तालुक्यातील माळेगाव, काटा, रिसोड तालुक्यातील कवठा, करंजी आदी गावांमध्ये पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. ग्रामीण भागात वीज भारनियमन घेतले जात असल्याने जलकुंभ पाण्याने भरण्यासाठी प्रचंड विलंब होत आहे. परिणामी, तीन दिवसांवरचा पाणीपुरवठा पाच ते सात दिवसांवर गेला असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. जलपातळीत कमालिची घट झाल्याने बोअरवेल कोरड्या पडत असल्याने पाणीटंचाईचे सावट अधिकच गडद होत आहे. उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या चटक्याने ग्रामीण भागातील जनता घामाघूम होत असल्याचे दिसून येते.