जिल्हास्तरीय ‘आंबेडकर श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा रविवारी

By Admin | Updated: April 26, 2017 01:56 IST2017-04-26T01:56:12+5:302017-04-26T01:56:12+5:30

अकोला- जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वानिमित्त रविवार, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता वसंत देसाई क्रीडांगण येथे केले आहे.

District level 'Ambedkar Shree' bodybuilding competition Sunday | जिल्हास्तरीय ‘आंबेडकर श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा रविवारी

जिल्हास्तरीय ‘आंबेडकर श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा रविवारी

अकोला : मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात यशस्वी शरीरसौष्ठव स्पर्धा घेऊन युवकांमध्ये बलोपासनेची आवड निर्माण करणाऱ्या प्रबुद्ध भारत बहूद्देशीय संस्थेच्या वतीने महानगरात जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वानिमित्त रविवार, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता वसंत देसाई क्रीडांगण येथे केले आहे.
स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या प्रथम विजेत्यास सात हजार एकाव्वन रुपये रोख व ‘डॉ. आंबेडकर श्री’ हा मानाचा खिताब बहाल करण्यात येणार आहे. या स्पर्धेत पंचावन्न ते साठ किलो वजन हा प्रथम गट, साठ ते पासष्ट हा द्वितीय, पासष्ट ते सत्तर हा तृतीय, सत्तर ते पंचाहत्तर हा चतुर्थ, तर पंचाहत्तर ते पुढे हा खुला गट ठेवण्यात आला आहे. प्रत्येक गटातील प्रथम पुरस्कार पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार, तृतीय दोन हजार रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, रेल्वेचे विभाग अभियंता निशीत मल्ल, माजी उपमहापौर सुनील मेश्राम, डॉ. अभय जैन, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, समाजकल्याण निरीक्षक सुरेंद्र तिडके, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ महेश गणगणे, पोलीस प्रक्षिक्षण केंद्राचे सहायक पोलीस अधीक्षक संतोष महल्ले, रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश बढे, विदर्भ बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष संग्राम गावंडे, नगरसेवक मंगेश काळे, अ‍ॅड. प्रवीण तायडे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा परीक्षण विदर्भ बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे निरीक्षक टिंकू शिंदे, हितेश टाक करणार असून, स्पर्धकांची वजन तपासणी ही २९ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता वसंत देसाई क्रीडांगण येथे होणार आहे.
प्रबुद्ध भारत संस्थेचे अध्यक्ष महेंद्र तायडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता धम्मपाल मेश्राम, गजानन कांबळे, सिद्धार्थ वरोटे, राहुल मस्के, पद्मानंद वानखडे, निर्भय पोहरे, रणजित वाघ, सोनू वाटमारे, चंदू शिरसाट, भारत मेश्राम, राजेश भीमकर, अर्जुन बागडे, प्रकाश पाटील, लकी वाघमारे, चेतन डोंगरे प्रयत्न करीत आहेत.

Web Title: District level 'Ambedkar Shree' bodybuilding competition Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.