बामसेफचे जिल्हा अधिवेशन संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST2021-07-20T04:14:44+5:302021-07-20T04:14:44+5:30

प्रथम सत्राच्या उद्घाटिका म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा प्रा.डॉ. आम्रपाली आखरे, प्रमुख अतिथी मंदाताई वानखडे, प्रमुख उपस्थिती भीमराव परघरमोल हे ...

District Convention of BamSafe concluded | बामसेफचे जिल्हा अधिवेशन संपन्न

बामसेफचे जिल्हा अधिवेशन संपन्न

प्रथम सत्राच्या उद्घाटिका म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा प्रा.डॉ. आम्रपाली आखरे, प्रमुख अतिथी मंदाताई वानखडे, प्रमुख उपस्थिती भीमराव परघरमोल हे असून, कार्यक्रमाची अध्यक्ष बामसेफचे जिल्हाध्यक्ष शहजाद खान होते.

द्वितीय सत्रामध्ये ‘कोरोना महामारीच्या काळातील सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदार भूमिकेने देशाला आणि जगाला समस्यांच्या खाईत लोटले!’ या विषयांवर प्रा. एम. बी. बल्लाळ, सय्यद जव्वाद हुसेन, डॉ. स्वप्नाताई लांडे यांनी विचार मांडले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बामसेफचे बुलडाणा जिल्हा प्रभारी राजेश गवई हे होते. तिसऱ्या सत्रामध्ये दीपक येलकर, एच. बी. कोकणे, शहजाद खान, भीमराव परघरमोल यांनी विचार मांडले, तर धीरज गणवीर यांनी अध्यक्षता केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश नृपनारायण, एस. टी. बहाकर, योगेश गोठकडे, मनोज पिंगळे, विकास तिरपुडे, सुरेश सोनवणे, प्रमोद सरदार, महादेव धुरंधर, अनिल पाटील सरोदे, विनोद आढाऊ तथा बामसेफच्या जिल्हा शाखेने परिश्रम घेतले.

Web Title: District Convention of BamSafe concluded