मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी जिल्हा समित्या गठित
By Admin | Updated: January 28, 2016 23:55 IST2016-01-28T23:55:23+5:302016-01-28T23:55:23+5:30
रणजित पाटील अकोला, वाशिम जिल्हा समितीचे अध्यक्ष; तर एकनाथ खडसे बुलडाणा जिल्हा समितीचे अध्यक्ष

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी जिल्हा समित्या गठित
अकोला: मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत जिल्हा स्तरावर रस्त्यांची निवड करण्याकरिता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अंतरिम समिती नियुक्त करण्यात आली आहे. अकोला, वाशिम जिल्ह्यातील समितीचे अध्यक्षपद गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे देण्यात आले.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेप्रमाणेच राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रस्त्यांची निवड करण्यासाठी समित गठित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी अंतरिम समिती २८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. या समितीचे अध्यक्षपद पालकमंत्र्यांकडे देण्यात आले असून, त्यांच्या शिफारशीनुसार दोन आमदारांची या समितीवर निवड करण्यात आली आहे. संबंधित विभागाचे अधीक्षक अभियंता या समितीचे सदस्य सचिव आहेत.
अकोला जिल्हा समिती
अध्यक्ष - डॉ. रणजित पाटील (पालकमंत्री), सदस्य - आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, सदस्य सचिव - अधीक्षक अभियंता.
वाशिम जिल्हा समिती
अध्यक्ष - डॉ. रणजित पाटील (पालकमंत्री), सदस्य लखन मलिक, आ. राजेंद्र पाटणी, सदस्य सचिव - अधीक्षक अभियंता.
बुलडाणा जिल्हा समिती
अध्यक्ष - एकनाथ खडसे (पालकमंत्री), सदस्य - आ. आकाश फुंडकर, आ. संयज कुटे, सदस्य सचिव - अधीक्षक अभियंता