जिल्हाधिका-यांनी घेतला मनपाचा आढावा

By Admin | Updated: September 2, 2015 02:29 IST2015-09-02T02:29:07+5:302015-09-02T02:29:07+5:30

रात्री दहा वाजेपर्यंत विभाग प्रमुखांसोबत बैठक.

District Collector review | जिल्हाधिका-यांनी घेतला मनपाचा आढावा

जिल्हाधिका-यांनी घेतला मनपाचा आढावा

अकोला: जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी रात्री सव्वाआठ ते दहा वाजेपर्यंत महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत सर्व विभाग प्रमुखांनी हजेरी लावत विभागनिहाय कामांची माहिती दिली. बुधवारी पार पडणार्‍या विशेष सभेसह स्थगित सर्वसाधारण सभेतील विषयावरदेखील जिल्हाधिकार्‍यांनी सविस्तर चर्चा केली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे मनपाच्या आयुक्तपदाचा प्रभार सोपविण्यात आल्यानंतर सोमवारी रात्रीच श्रीकांत यांनी मनपा परिसरात येऊन पाहणी केली होती. मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजता जिल्हाधिकारी मनपात दाखल झाले. बुधवारी विशेष सभेमध्ये चार विषयांवर चर्चा होणार आहे. तर दुपारी पार पडणार्‍या स्थगित सर्वसाधारण सभेत १४ विषयांवर चर्चा करून निर्णय घेतल्या जातील. या दोन्ही सभेतील विषयांबद्दल जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित विभाग प्रमुखांकडून माहिती घेतली. यावेळी उपायुक्त सुरेश सोळसे, प्रभारी नगर रचनाकार विजय इखार, सहायक आयुक्त राजेंद्र घनबहाद्दूर, शहर अभियंता अजय गुजर, जलप्रदायचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, क्षेत्रीय अधिकारी जी.एम.पांडे, अनिल बिडवे, कैलास पुंडे, वासुदेव वाघाडकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, सहायक आरोग्य अधिकरी सुरेश पुंड आदी उपस्थित होते.

Web Title: District Collector review