जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:16 IST2021-07-17T04:16:00+5:302021-07-17T04:16:00+5:30

अकोला : जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेस जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शुक्रवारी भेट दऊन पाहणी ...

District Collector inspects District Water Testing Laboratory! | जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी !

जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी !

अकोला : जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेस जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शुक्रवारी भेट दऊन पाहणी केली. या प्रयोगशाळेला मिळालेल्या ‘एनएबीएल’ प्रमाणपत्राचे विमोचन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठाचे कृषी अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, वनविद्या विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे, वरिष्ठ भू वैज्ञानिक प्रवीण बरडे, शिवाजी महाविद्यालयाचे भूशास्त्र विभागप्रमुख गणेश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक तिडके आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या प्रयोगशाळेची पाहणी करून कामकाजाविषयी माहिती घेतली. प्रयोगशाळेस प्राप्त झालेले राष्ट्रीय प्रयोगशाळा चाचणी व क्षमता मूल्यमापन संस्थेच्या अधिस्वीकृती प्रमाणपत्राचे विमोचन जिल्हाधिकारी अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रयोगशाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

...........................फोटो...................................

Web Title: District Collector inspects District Water Testing Laboratory!