होम आयसोलेशनमधील पॉझिटिव्ह रुग्णांना कीटचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:21 IST2021-05-25T04:21:12+5:302021-05-25T04:21:12+5:30
अकोला : संसर्गजन्य कोरोना विषाणूची लक्षणे आढळून येणाऱ्या व गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना काळजी घेण्याच्या अनुषंगाने विविध साहित्याचा ...

होम आयसोलेशनमधील पॉझिटिव्ह रुग्णांना कीटचे वितरण
अकोला : संसर्गजन्य कोरोना विषाणूची लक्षणे आढळून येणाऱ्या व गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना काळजी घेण्याच्या अनुषंगाने विविध साहित्याचा समावेश असलेल्या मेडिकल कीटचे सोमवारी मनपा आयुक्त निमा अरोरा यांच्या उपस्थितीत पूर्व झोनमध्ये वाटप करण्यात आले. यासंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार कीटचे वितरण करण्यात आले.
शहरात पूर्व व दक्षिण झोनमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. दरम्यान, होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अँटिव्हायरल औषधी, मल्टीव्हिटॅमिन औषधी, ताप, अंगदुखी, डोकेदुखीसाठी पॅरासिटामॉल औषधी आणि कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घेण्याबाबतच्या पत्रकाचा या मेडिकल कीटमध्ये समावेश आहे. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता पाठक यांनी कोरोना रुग्णांशी संवाद साधून त्यांना औषधे कशा प्रकारे घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव, कर अधीक्षक विजय पारतवार, शिक्षणाधिकारी डॉ. शाहीन सुल्ताना, डॉ. छाया ऊगले, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक शैलेश पवार, आरोग्य निरीक्षक प्रकाश मनवर तसेच शिक्षक आणि आशा वर्कर उपस्थित होते.