महिनाभरात २२८५ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 10:50 AM2020-11-09T10:50:07+5:302020-11-09T10:50:25+5:30

Akola Crop Loan News २ हजार २८५ शेतकऱ्यांना १८ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

Distribution of crop loans to 2285 farmers in a month! | महिनाभरात २२८५ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप!

महिनाभरात २२८५ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप!

googlenewsNext

अकोला: रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत गत महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील २ हजार २८५ शेतकऱ्यांना १८ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात ७ हजार ५०० शेतकऱ्यांना ६० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यानुषंगाने गत १ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील बॅंकांमार्फत पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत गेल्या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील २ हजार २८५ शेतकऱ्यांना १८ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांमार्फत १ हजार ९४६ शेतकऱ्यांना १५ कोटी २८ लाख रुपये आणि ग्रामीण बॅंकांमार्फत ३३९ शेतकऱ्यांना ३ कोटी ३८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत २ हजार २८५ शेतकऱ्यांना १८ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

- आलोक तारेणिया, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक.

Web Title: Distribution of crop loans to 2285 farmers in a month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.