शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात बोंडअळीची मदत तालुका स्तरावर वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 14:20 IST

अकोला : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधी वाटपाच्या दुसºया हप्त्यात ५४ कोटी २० लाख रुपयांचा प्राप्त झालेला मदतनिधी २० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर वितरित करण्यात आला.

ठळक मुद्दे १ लाख ३३ हजार ६६८ कापूस उत्पादक शेतकºयांचे १ लाख ४३ हजार ४८० हेक्टर ८५ आर क्षेत्रावरील कपाशी पिकाचे नुकसान झाले होते. पीक नुकसान भरपाईपोटी शासन निर्णयानुसार बोंडअळीग्रस्त शेतकºयांसाठी मदत जाहीर करण्यात आली होती. मदत वाटपाच्या पहिल्या हप्त्यात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ३६ कोटी १४ लाखांचा मदतनिधी प्राप्त झाला होता.

अकोला : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधी वाटपाच्या दुसºया हप्त्यात ५४ कोटी २० लाख रुपयांचा प्राप्त झालेला मदतनिधी २० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर वितरित करण्यात आला. तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम संबंधित बोंडअळीग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ६६८ कापूस उत्पादक शेतकºयांचे १ लाख ४३ हजार ४८० हेक्टर ८५ आर क्षेत्रावरील कपाशी पिकाचे नुकसान झाले होते. पीक नुकसान भरपाईपोटी शासन निर्णयानुसार बोंडअळीग्रस्त शेतकºयांसाठी मदत जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांसाठी शासनामार्फत १३५ कोटी ५१ लाख ७४ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. शासन निर्णयानुसार बोंडअळीग्रस्त शेतकºयांना मदतीचे वाटप तीन हप्त्यात करण्यात येत आहे. त्यामध्ये मदत वाटपाच्या पहिल्या हप्त्यात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ३६ कोटी १४ लाखांचा मदतनिधी प्राप्त झाला होता. उपलब्ध मदत निधी वाटपातून शिल्लक राहिलेला ९ कोटी ३ लाखांचा निधी आणि दुसºया हप्त्यातील ४५ कोटी १७ लाख, असा एकूण ५४ कोटी २० लाख रुपयांचा मदतनिधी १९ जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतनिधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २० जुलै रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आला असून, तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम बोंडअळीग्रस्त संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.तालुकानिहाय वितरित असा आहे मदतनिधी!तालुका                               रक्कमअकोला                               ८४११५५००बार्शीटाकळी                        ४१२४६०००अकोट                                १४०८२४०००तेल्हारा                               ११०३२७८००बाळापूर                              ८६०११०००पातूर                                  २४६३७२००मूर्तिजापूर                           ५४८३८५००.........................................................एकूण                                 ५४२००००००

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी