गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप, येण्याची-जाण्याची समस्या मार्गी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:22 IST2021-09-24T04:22:48+5:302021-09-24T04:22:48+5:30
पिंपळखुटा येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये पाचवी वर्गापर्यंत शाळा आहे. परंतु, सहाव्या वर्गापासून विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षण घ्यावे लागत आहे. ...

गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप, येण्याची-जाण्याची समस्या मार्गी!
पिंपळखुटा येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये पाचवी वर्गापर्यंत शाळा आहे. परंतु, सहाव्या वर्गापासून विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षण घ्यावे लागत आहे. पालकांची हलाखीची परिस्थिती असल्याने पालक विद्यार्थ्यांना अपडाऊन करण्यासाठी सायकल विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे खेट्री येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू हायस्कूल व पिंपळखुटा येथील जिल्हा परिषद उर्दू व मराठी या तीन शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन बुधवारी सहा विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले आहे. यावेळी उर्दू हायस्कूलचे शिक्षक रईस बेग, नसीर अहमद व पिंपळखुटा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक आयाज खान, शिक्षक मतीन अहमद, अंगणवाडी सेविका शमीम बानो, शाळा समिती अध्यक्ष शब्बीर शाह, तसेच मराठी शाळेचे शिक्षक केंद्रीय मुख्याध्यापक अरविंद काळे, संजय नेमाडे व पालक वर्ग उपस्थित होते.
फोटो:
230921\img20210922123024.jpg
???? ????????????? ????????? ????