‘रेशन धान्याचे त्वरित वाटप करा!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:18 AM2021-05-08T04:18:24+5:302021-05-08T04:18:24+5:30

-------------------------------------- पातूर नंदापूर येथे गावठी दारू अड्ड्यावर छापा पातूर नंदापूर: पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पातूर नंदापूर येथे ...

‘Distribute ration grains now!’ | ‘रेशन धान्याचे त्वरित वाटप करा!’

‘रेशन धान्याचे त्वरित वाटप करा!’

Next

--------------------------------------

पातूर नंदापूर येथे गावठी दारू अड्ड्यावर छापा

पातूर नंदापूर: पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पातूर नंदापूर येथे विशेष पथकाने गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पातूर नंदापूर येथे गावठी दारूभट्टीवर छापा टाकला असता, भगवान उत्तम भगत, विलास भीमराव खरात, प्रशांत सखाराम खंडारे, नीलेश रमेश वकपंजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी नदी पात्रातील मोहा नष्ट केला. आरोपीविरुद्ध पिंजर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो)

-------------------------------------

कॉम्प्लेक्स परिसरात अतिक्रमण वाढले

मूर्तिजापूर : कॉम्प्लेक्स परिसरात विविध मार्गांवर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे. अनेक व्यावसायिकांनी काॅम्प्लेक्स भागातील अंतर्गत रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ते अरूंद झाल्याचे दिसून येते.

--------------------------------

लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

पातूर: कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयाच्या वेळेवर येणे गरजेचे असतानाही बहुतांश कर्मचारी ११ वाजल्याशिवाय येतच नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिक येऊन अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत असतात. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत नागरिकांना टेबलाजवळ उभे राहावे लागते.

---------------------------------

आरोग्य केंद्राच्या इमारती जीर्णावस्थेत

पातूर: तालुक्यातील चतारी येथील आरोग्य केंद्राच्या इमारती जीर्णावस्थेत असून, येथील रुग्णवाहिकादेखील आजारी अवस्थेत आहे. तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रांच्या भिंतीला तडा गेल्या आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

--------------------------------------

‘कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या!’

तेल्हारा: ऑनलाइन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटीसोबतच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे; मात्र अनेक शाळांमधील शिक्षक तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. शाळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अनेक कर्मचारी इंटरनेट कॅफेमधून दुसऱ्याकडून ऑनलाइन कामे करून घेत आहेत.

------------------------------------

दिशादर्शक फलक बेपत्ता

बार्शीटाकळी : तालुक्यातील मार्गांवर लावण्यात आलेले अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक बेपत्ता झाले आहेत. यामुळे रात्री अनोळखी नागरिक तसेच वाहनचालक रस्ता विसरून भलतीकडेच वळतात. संबंधित यंत्रणेने अशा ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.

-----------------------------

खाद्यपदार्थांची रस्त्यावरच विक्री

अकोट: शहरातील अंतर्गत रस्त्यांवर उघड्यावर खुलेआम खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे़. हल्ली उघड्यावर खाद्य पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

--------------------------------------

टाकळी खुरेशी येथील वीज पुरवठा वारंवार खंडित

बा‌ळापूर : तालुक्यातील टाकळी खुरेशी परिसरात अनेक दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: रात्रीच्या सुमारास वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत; परंतु सुरळीत वीज पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

--------------------------------------------------------

प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करा

पातूर: तालुक्यातील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना त्रास होत असल्याने प्रवासी निवाऱ्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील प्रवाशांकडून होत आहे. प्रवाशांना उन्ह, वारा, पावसात उभे राहावे लागते; मात्र प्रवासी निवाऱ्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन येथील निवाऱ्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: ‘Distribute ration grains now!’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.