‘निमंत्रण पत्रिका’ प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्यास हक्कभंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 02:04 IST2017-05-16T02:04:31+5:302017-05-16T02:04:31+5:30

गोवर्धन शर्मा यांचा इशारा: मनपात सभापती बाळ टाले यांचा पदग्रहण सोहळा

Dissemination of the 'Invitation Magazine' case, Dwiveda! | ‘निमंत्रण पत्रिका’ प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्यास हक्कभंग!

‘निमंत्रण पत्रिका’ प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्यास हक्कभंग!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: एलईडी पथदिव्यांच्या उद्घाटन कार्यक्रमातील निमंत्रण पत्रिका प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्यास संबंधितांवर हक्कभंग दाखल करणार असल्याचा सज्जड इशारा ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिला. महापालिकेत स्थायी समिती सभागृहात सभापती बाळ टाले, सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार यांच्या पदग्रहण सोहळ््यात ते बोलत होते.
महापालिकेत १६ सदस्यीय स्थायी समितीच्या सभापतीपदी बाळ टाले यांची निवड झाली. स्थायी समितीपदी भाजप नगरसेवक बाळ टाले यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या वतीने पदग्रहण सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ््याला खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी एलईडी पथदिव्यांसाठी शासनाकडून १० कोटींचा निधी मिळवला होता. त्यामध्ये प्रशासनाने १४ व्या वित्त आयोगातून १० कोटींचा हिस्सा जमा केला. एलईडी पथदिव्यांचे उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण पत्रिकेवर दोन्ही आमदारांचे छायाचित्र नसल्याचा मुद्दा उपस्थित होऊन भाजपमध्ये नाराजीचा सूर पसरला. अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचे भान ठेवणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींचा अपमान सहन केला जाणार नाही. निमंत्रण पत्रिका प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्यास हक्कभंग दाखल करणार असल्याचे आ. शर्मा यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी डॉ. किशोर मालोकार, दीपक मायी, डॉ. युवराज देशमुख, गटनेता राहुल देशमुख, हरीश आलिमचंदानी, अजय शर्मा, विजय इंगळे, विलास शेळके यांसह भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

रस्त्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष!
शहरात सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे निर्माण कार्य सुरू आहे. त्यांचा दर्जा योग्य नसल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्येक ठिकाणी पैसा खाणे योग्य नाही. त्यामुळे रस्त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या, अशा कानपिचक्या खासदार संजय धोत्रे यांनी दिल्या. शहर विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड सहन क रणार नसल्याचे खा. धोत्रे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Dissemination of the 'Invitation Magazine' case, Dwiveda!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.