शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
3
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
4
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
5
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
6
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
7
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
8
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
9
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
10
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
11
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
12
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
13
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
14
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
15
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
16
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
17
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
18
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
19
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
20
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण

अकोला जिल्ह्यातील १२८ थकबाकीदार पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित

By atul.jaiswal | Published: February 15, 2018 5:50 PM

अकोला : महावितरणने वीजदेयक न भरणाºया जिल्ह्यातील १२८ पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे.

ठळक मुद्देअकोला मंडळातील पाणीपुरवठा वर्गवारीतील एकूण ६६३ ग्राहकांकडे वीज देयकाचे ८ कोटी ६ लाख ९२ हजार रुपये एवढी थकबाकी प्रलंबित आहे. त्यापैकी १२८ पाणीपुरवठा योजनांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून यापैकी ५८ पाणीपुरवठा योजनांचा फेब्रुवारी महिन्यामध्ये खंडित करण्यात आला आहे. महावितरणने सर्वच वर्गवारीच्या थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली असून नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

अकोला : महावितरणने वीजदेयक न भरणाºया जिल्ह्यातील १२८ पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. या योजनांकडे तब्बल ६४ लाख ६ हजार रुपयांची थकबाकी असल्यामुळे महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली आहे.महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली असून त्यांतर्गत अकोला मंडळातील पाणीपुरवठा वर्गवारीतील एकूण ६६३ ग्राहकांकडे वीज देयकाचे ८ कोटी ६ लाख ९२ हजार रुपये एवढी थकबाकी प्रलंबित आहे. त्यापैकी १२८ पाणीपुरवठा योजनांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून यापैकी ५८ पाणीपुरवठा योजनांचा फेब्रुवारी महिन्यामध्ये खंडित करण्यात आला आहे. ग्राहकांनी थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.अकोला जिल्ह्यातील एकून १२८ पाणीपुरवठा योजनांचा खंडित करण्यात आला. यामध्ये एकट्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ५८ पाणीपुरवठा योजनांचा करण्यात आला.वीजपुरवठा खंडीत करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांमध्ये उपविभागनिहाय अकोट १०, तेल्हारा १०, अकोला ७, बाळापुर १२, बार्शिटाकली २, मुर्तीजापूूर ७ आणि पातुर १० योजनांचा सामावेश आहे. या योजनांकडे एकून ६४ लाख ६ हजार रुपये एवढी थकबाकी प्रलंबित होती. महावितरणने सर्वच वर्गवारीच्या थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली असून नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागू शकते. थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा वेळेत करून सहकार्य करण्याचे आवाहन अकोला परीमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांनी केले आहे.

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणmahavitaranमहावितरण