वीज वितरणच्या कार्यालयात तोडफोड
By Admin | Updated: July 18, 2014 00:45 IST2014-07-18T00:34:41+5:302014-07-18T00:45:06+5:30
अकोट येथील प्रकार: एकास अटक , दोन फरार

वीज वितरणच्या कार्यालयात तोडफोड
आकोट: वीज वितरण कंपनीच्या येथील कार्यालयात जाऊन तोडफोड केल्याप्रकरणी साहाय्यक अभियंत्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकोट पोलिसांनी शनिवार १७ जुलै रोजी एकास अटक केली, तर दोघे जण फरार होण्यात यशस्वी झाले.
फिर्यादी पुरुषोत्तम कनिराम चव्हाण (३७) सहाय्यक अभियंता वीज वितरण, यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १७ जुलैचे दुपारी १.४५ वाजता नीलेश बरेठिया, सचिन तेलगोटे तथा एक अनोळखी इसम हे तिघेजण वीज वितरणच्या कार्यालयात आले आणि शहरातील कमिटी फाईल परिसरात एका इसमाच्या घरावर लोंबकळत असलेल्या वीज तारांचा प्रश्न उपस्थित करीत त्या तिघांनी वाद घातला. त्यानंतर कार्यालयातील मेज व खुच्र्यांची फेकाफेक केली. कार्यालय अस्ताव्यस्त करण्यात आले. तसेच कॉलर पकडून या संदर्भात पोलिसात तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
पुरुषोत्तम कनिराम चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकोट पोलिसांनी नीलेश बरेठिया, सचिन तेलगोटे व इतर एका अनोळखी इसमाविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३४, ७0६, तसेच सार्वजनिक मालमत्ता प्रतिबंधक कायदा अधिनियम १९८४ चे कलम ३ (२) (अ) नुसार उपरोक्त तिन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी नीलेश बरेठिया याला अटक केली असून, अन्य दोघे फरार आहेत. पुढील तपास दिलीप मोडक करीत आहेत.