विद्युत पुरवठा खंडित, अघोषित भारनियमन
By Admin | Updated: September 28, 2014 01:57 IST2014-09-28T01:57:57+5:302014-09-28T01:57:57+5:30
अकोला शहरातील विद्युत पुरवठा पाच तास खंडित.

विद्युत पुरवठा खंडित, अघोषित भारनियमन
अकोला : शहरात सर्वत्र नवरात्रोत्सवात उत्साहाचे वातावरण असताना शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे भाविकांच्या उत्साहात भंग झाला. शनिवारी अनेक भागातील विद्यु त पुरवठा चार ते पाच तास बंद होता.
शनिवारी काही भागात सकाळपासून तर काही भागात दुपारी विद्युत पुरवठा खंडित झाला. भारनियमन बंद असताना अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. पॉवरग्रीडच्या वीज वाहिन्यांमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वीज उपलब्ध अस तानाही राज्यात शनिवारी सकाळी ९ वाजतानंतर तीन ते चार तासांचे भारनियमन करण्यात आले. हे भारनियमन ह्यडह्ण व त्यावरील वर्गवारीतील वाहिन्यांवर करण्यात आले. वर्धा ते औरंगाबाद या ७६५ केव्हीए आणि औरंगाबाद ते तळेगाव या ४00 केव्हीए क्षमतेच्या वाहिन्यांवरील तांत्रिक बिघाड व अतिभारामुळे ही स्थिती निर्माण झाली. यामुळे वीज उपलब्ध असतानाही सुमारे ६00 ते ७00 मेगावॉट वीज ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात अडचणी आल्या.