व्याळा येथे दोन गटांत वाद; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:17 IST2021-05-01T04:17:46+5:302021-05-01T04:17:46+5:30

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्याळा येथील पोलीस पाटील यशवंत देशमुख हे गावातील शांतता व सुव्यवस्था सांभाळत संचारबंदीत ...

Dispute between two groups at Vyala; Filed a crime | व्याळा येथे दोन गटांत वाद; गुन्हा दाखल

व्याळा येथे दोन गटांत वाद; गुन्हा दाखल

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्याळा येथील पोलीस पाटील यशवंत देशमुख हे गावातील शांतता व सुव्यवस्था सांभाळत संचारबंदीत पोलीस प्रशासनाला सहकार्य म्हणून गावात सुरू असलेली दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत असताना प्रकाश दामोदर नथवाणी व त्याची दोन मुले जीगर नथवाणी (वय २६), मेहुल नाथवानी (१९) यांनी शासकीय कामात अडथळा आणून पोलीस पाटील देशमुख यास जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुसऱ्या घटनेत, महिलेने दिलेल्या फिर्यादीनुुसार, पोलीस पाटील यशवंत नारायण देशमुख यांनी घराची साखळी वाजवून घरात शिरून विनयभंग केला. या फिर्यादीवरून पोलिसांनी पोलीस पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Dispute between two groups at Vyala; Filed a crime