नरसीपूर (पंचगव्हाण) येथे दोन गटात वाद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:14 IST2021-06-20T04:14:55+5:302021-06-20T04:14:55+5:30
तेल्हारा : तालुक्यातील नरसीपूर (पंचगव्हाण) येथे एका समाजाच्या दोन गटात वाद होऊन परस्परांना शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी ...

नरसीपूर (पंचगव्हाण) येथे दोन गटात वाद !
तेल्हारा : तालुक्यातील नरसीपूर (पंचगव्हाण) येथे एका समाजाच्या दोन गटात वाद होऊन परस्परांना शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवार, दि. १८ जून रोजी आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
शबाना परवीन मंजूर शहा (३०) रा. नरसीपूर (पंचगव्हाण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी घरी कपडे धूत असताना आरोपींपैकी शहनाजबी व सलीम शहा हे दोघे अंगणात आले व शिवीगाळ केली, तसेच शहनाजबी हिने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शहनाजबीच्या दोन मुली गुड्डीयाबी व बुसराबी यांनी फिर्यादीला पकडले. फिर्यादीच्या पतीने भांडण सोडविल्यानंतर शहनाजबीचे पतीने घरी येऊन फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी शहनाजबी, सलीम शहा, गुड्डीयाबी, बुसराबी (रा. नरसीपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर दुसरी शहनाजबी सलीम शहा (४०) (रा. नरसीपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी ती नाली साफ करीत असताना आरोपींपैकी मुस्ताक शहा मुमताज शहा व मकसूद शहा मुस्ताक शहा यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी शबानाबी मंजूर शहा हिने फिर्यादीस रस्त्यावरून ओढून थापडा बुक्क्यांनी मारहाण केली. मुस्ताक शहा, मकसूद शहा, मंजूर शहा यांनी लोटपाट केली. या फिर्यादीवरून चार आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल विजय जांभळे करीत आहेत.