सरदार सरोवरातील विस्थापित आदिवासी बांधव झाले सहभागी, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्यातील वाडेगावात दाखल

By आशीष गावंडे | Published: November 17, 2022 10:52 AM2022-11-17T10:52:51+5:302022-11-17T10:53:08+5:30

नंदुरबार जिल्ह्यात सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापित शेतकरी बांधव व  आदिवासींना अद्यापही त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही.

Displaced tribal brothers of Sardar Sarovar participated Rahul Gandhi Bharat Jodo Yatra reached Wadegaon in Akola district | सरदार सरोवरातील विस्थापित आदिवासी बांधव झाले सहभागी, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्यातील वाडेगावात दाखल

सरदार सरोवरातील विस्थापित आदिवासी बांधव झाले सहभागी, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्यातील वाडेगावात दाखल

Next

अकोला
 
नंदुरबार जिल्ह्यात सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापित शेतकरी बांधव व  आदिवासींना अद्यापही त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात नंदुरबार येथील शेतकऱ्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये पातूर तालुक्यातून सहभाग घेतला. यावेळी नंदुरबार येथील आदिवासी बांधव तसेच शेतकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात पदयात्रा सुरू केली.  पदयात्रेमध्ये विस्थापित झालेले सर्व शेतकरी बांधव तसेच अनुरुजी वसावे, पुण्या बसावे, प्रमुख प्रतिनिधी म्हणून नुरजी वसावे, हिरालाल पावरा, नाच्या पावरा, नाक्या पावरा यांच्यासह असंख्य  प्रकल्पग्रस्त यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.

Web Title: Displaced tribal brothers of Sardar Sarovar participated Rahul Gandhi Bharat Jodo Yatra reached Wadegaon in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.