स्त्री रुग्णालयात दगावलेले अर्भक आढळले कच-यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2016 02:49 IST2016-11-07T02:49:00+5:302016-11-07T02:49:00+5:30

मृत अर्भक आढळले रामदासपेठेतील मनपाच्या शाळेच्या आवारात.

The disfavored infant found in women hospital | स्त्री रुग्णालयात दगावलेले अर्भक आढळले कच-यात

स्त्री रुग्णालयात दगावलेले अर्भक आढळले कच-यात

अकोला, दि. ६- जिल्हा स्त्री रुग्णालयात मृत झालेले दोन दिवसांचे महिला जातीचे अर्भक रामदासपेठेतील मनपाच्या शाळा क्रमांत सातच्या परिसरात आढळल्याची घटना रविवारी सकाळी घडली. सदर अर्भक रामदासपेठ पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर अंतिम संस्कार केले.
मनपाच्या शाळा क्रमांक सातनजीक असलेल्या एका कचर्‍याच्या ढिगाजवळ स्त्री जातीचे आणि दोन दिवसांचे वय असलेले हे अर्भक शासकीय शिक्का असलेल्या एका पिशवीमध्ये कचर्‍यात टाकले होते.
सदर अर्भक महिला जातीचे असल्याने घटनास्थळावर विविध तर्कवितर्क लावण्यात आले; मात्र ते स्त्री रुग्णालयातच मृत झालेले असून, त्यानंतर या ठिकाणी टाकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अर्भकाजवळ साडी आणि एक पेटिकोटही आढळून आला. पोलिसांनी या अर्भकावर अंतिम संस्कार करून कापड जप्त केले असून, पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: The disfavored infant found in women hospital