शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

मूर्तिजापुरातील आपत्ती निवारण साहित्य तीन वर्षांपासून जेलखान्यात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 3:00 PM

एकदाही वापर न झालेले साहित्य मात्र आता तहसील कार्यालयातील जुन्या जेल खान्यात बंदिस्त असून, धूळ खात पडले आहे.

- संजय उमक  लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : तालुक्यातील आपत्ती निवारणासाठी शासन स्तरावरून मूर्तिजापूर उपविभागासाठी तीन वर्षांपूर्वी आपत्ती निवारण साहित्य पुरविण्यात आले होते; परंतु तेव्हापासून एकदाही वापर न झालेले साहित्य मात्र आता तहसील कार्यालयातील जुन्या जेल खान्यात बंदिस्त असून, धूळ खात पडले आहे.नैसर्गिक आपत्ती, संकटापासून नागरिकांचे संरक्षण व बचाव व्हावा, त्यांना सर्व बाबींची माहिती उपलब्ध व्हावी, या दृष्टीने तहसील स्तरावर नैसर्गिक आपत्ती हा खास कक्ष आहे. बहुतेक पावसाळ्याच्या दिवसांत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून नागरिकांचा बचाव करण्याच्या साहित्याचा समावेश आहे. यामध्ये १ मेगा फोन, १ सर्च लाइट, १ हेल्मेट, १ बोट, १ बोट फ्रेम, १ बोट इंजीन, १५ लाइफ जॅकेट व ५ रिंग इत्यादी साहित्याचा समावेश आहे. सर्व साहित्य धूळ खात पडले असल्याने उंदराच्या तडाख्यात सापडले आहे. हे सर्व साहित्य सुरक्षित असेल का, हेही औत्सुक्याचे ठरले आहे. आपत्कालीन काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी येणारे साहित्यच सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्व साहित्य धुळीने माखलेले असून, पूर्वी जेथे गुन्हेगारांना अथवा आरोपींना बंदिस्त ठेवल्या जायचे, तिथे आता उपरोक्त साहित्य बंदिस्त आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला