विद्यार्थ्यांना दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 14:06 IST2017-10-14T14:06:32+5:302017-10-14T14:06:32+5:30

Disaster management lessons given to students | विद्यार्थ्यांना दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

विद्यार्थ्यांना दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

ठळक मुद्दे आपत्ती निवारण दिवस साजरा



अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आपत्ती निवारण दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानंतर ‘एनएसएस’ व स्काउट-गाइडच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.
आपत्ती निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून पुरवठा विभागाचे तहसीलदार औदुंबर पाटील, नायब तहसीलदार सतीश काळे, एनएसएसचे जिल्हा समन्वयक डॉ. संजय तिडके, प्रा. सुधीर कोहचाळे उपस्थित होते. या कार्यक्रमात संदीप वाघडकर यांनी प्रथमोपचार आणि एस.व्ही. पाटील यांनी पूर, वीज, आग , रस्ता अपघात इत्यादी आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना ‘फायर मॉक ड्रिल’सह आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र इंगळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांच्यासह पोलीस, होमगार्ड, अग्निशमन विभाग, शोध व बचाव पथकाचे सदस्य आणि एनएसएस व स्काउट-गाइडचे विद्यार्थी उपस्थित होते.

 

Web Title: Disaster management lessons given to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.