वंचित लाभार्थींना रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ द्यावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:17 IST2021-01-22T04:17:55+5:302021-01-22T04:17:55+5:30
पातूर: नगर परिषद हद्दीतील दलित वस्तीमधील पात्र लाभार्थींना तात्काळ रमाई आवास योजनेंर्गत लाभ देण्याची मागणी करीत रिपब्लिकन पार्टी ...

वंचित लाभार्थींना रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ द्यावा!
पातूर: नगर परिषद हद्दीतील दलित वस्तीमधील पात्र लाभार्थींना तात्काळ रमाई आवास योजनेंर्गत लाभ देण्याची मागणी करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने न.प. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
नगर परिषद हद्दीतील वास्तव्यास असणारे अनेक पात्र लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित आहेत. शहरातील काही नागरिकांना पात्र नसतानाही घरकुलाचा लाभ देण्यात आला, तर काही नागरिकांना हेतूपुरस्सर लाभ देण्यात आल्या नसल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने निवेदनातून केला आहे. लोकप्रतिनिधींनी घरकुल देण्याचा ठराव सन २००९ मध्येच मान्य सुद्धा केला आहे. तरीसुद्धा नगर परिषद प्रशासन लाभार्थ्यांना वंचित ठेवत आहे. त्यामुळे अशा वंचित लाभार्थींना रमाई आवास योजनेंतर्गत त्वरित लाभ देण्याची मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हासंघटक आकाश हिवराळे यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मागणी मान्य न झाल्यास रिपाई स्टाईलने आंदोलन छेडण्याचा ईशाराही निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना गयाबाई धाडसे, किरण कांबळे, वंदना धाडसे, सुष्मा कांबळे, रेखा धाडसे, बबिता धाडसे, लक्ष्मण अवचार, सागर इंगळे, सुरज धाडसे, अमर धाडसे, शुभम धाडसे, श्याम कराळे आदींसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.