वाडेगाव येथे बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST2021-09-11T04:21:06+5:302021-09-11T04:21:06+5:30

वाडेगाव : बाळापूर-पातूर महामार्गावरील वाडेगाव बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे परिसरात ...

Dirt kingdom in the bus stand area at Wadegaon! | वाडेगाव येथे बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य!

वाडेगाव येथे बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य!

वाडेगाव : बाळापूर-पातूर महामार्गावरील वाडेगाव बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

बसस्थानक परिसरात अनेक दुकाने, सेंट्रल बँक तसेच हॉटेल्स आहेत. मुख्य रस्त्यावर कचऱ्याचा ढीग टाकलेले असल्याने परिसरात ग्रामस्थांना उभे राहण्यास अडचण निर्माण होत आहे. या घाणीच्या कचऱ्याच्या सभोवती डुकरे, कुत्रे, जनावरे आदी फिरत असल्याने वाहनांना मोठी अडचण निर्माण होत आहे. कचऱ्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झालेला आहे. त्यामुळे यापुढेही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे संबधित विभागाने लक्ष देऊन समस्या दूर करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

-----------------------

मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाण असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन स्वच्छता करावी.

- अनील बारबुदे, ग्रामस्थ वाडेगाव.

------------------------

पातूर-बाळापूर रस्त्यावर टाकलेल्या घाणीमुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे ग्राम प्रशासनाने लक्ष द्यावे.

- श्रीकांत मसने, युवा कार्यकर्ता वाडेगाव.

Web Title: Dirt kingdom in the bus stand area at Wadegaon!