शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पोपटखेड धरणाच्या पात्रात जेवणावळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2017 05:44 IST

अकोट तालुक्यात पाण्याची पातळी खालावली.

विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट तालुक्याच्या भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. विशेष म्हणजे, १00 टक्के पाणीसाठा भरलेल्या पोपटखेडच्या धरणाच्या पात्रात आता पाण्याचा मृतसाठा असल्याने धरणाच्या आतमधील पाणी सोडण्याच्या गेटजवळ चक्क जेवणावळीचा कार्यक्रम पार पडला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाय, या धरणातून गाळाऐवजी वाळूचा उपसा मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. तापी खोर्‍यातील पूर्णा नदीच्या उपखोर्‍यातून वाहणार्‍या पोपटखेड गावाजवळील पठार नदीवर पोपटखेड धरण बांधण्यात आले आहे. या धरणातील पाणीसाठा लक्षात घेता पाणी सोडण्याकरिता चार गेट आहेत. सातपुड्यातील सर्व नद्यांचे एकत्रीकरण होऊन हे धरण दरवर्षी १00 टक्केभरत असल्याने पाणी सोडण्यात येते. पाणीसाठा जास्त होत असल्याने पोपटखेड धरण टप्पा दोनचेसुद्धा बांधकाम करण्यात येत आहे. दुसरीकडे सध्या अस्तित्वात असलेल्या पोपटखेड धरणाच्या पात्रातील पाणीसाठा आटला आहे. धरणाचा डावा कालवा बंद असल्यामुळे शेतकर्‍यांना सिंचनाकरितासुद्धा पाणी मिळू शकले नाही. अशा स्थितीत धरणामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा राहील, असा अंदाज होता; परंतु पावसाळा लागण्यापूर्वीच गेटजवळील धरणपात्र उघडे पडले आहे. त्यावरून या भागातील पाणी पातळी किती खोलवर जात आहे, हे दिसून येत आहे. चक्क धरणामध्ये पाणी सोडण्याच्या गेटच्या मागे मंडप टाकून जेवणावळ पार पडली आहे. त्यावरून या धरणातील पाणीसाठा हा किती खालावला आहे, याचा अंदाज येत आहे. पोपटखेड धरणातील गेटचा परिसर वगळता इतर खोलगट भागात थोड्याफार प्रमाणात पाणी आहे. अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाही. प्रखर उन्हाळ्याच्या दिवसांत या धरणातील पाणीसाठा खालावत गेला. विशेष म्हणजे, यंदा सिंचनालासुद्धा पाणी देण्यात आले. पोपटखेड धरणात सातपुड्याच्या प्रवाहातील पाणीसाठा हा आवाक्याच्या बाहेर होणार असल्याने शासनाने पोपटखेड धरणाच्या दुसर्‍या टप्प्याला मंजुरात दिली आहे. दुसर्‍या टप्प्यातील या धरणाची लांबी २५0 मीटर, माथा रुंदी ४.५0 मीटर तर महत्तम उंची २६.८६ राहणार आहे. या दुसर्‍या टप्प्यातील धरणात ८,३६८ द.ल.घ.मी. पाणीसाठा होणार आहे; परंतु सध्या अस्तित्वात असलेल्या पोपटखेड धरणातील गाळाची क्षमता पाहता धरणाच्या आतमधील गेटजवळ जेवणावळी या धरणातील पाणीसाठय़ावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्‍या ठरत आहेत. सध्या पोपटखेड धरणातील पाणीसाठा हा किती आहे व मृतसाठा किती आहे, याबाबत लघू पाटबंधारे विभागाचे उपअभियंता दिनेश शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना याबाबत विचारणा करण्यास सांगितले. त्यावरून संबंधित अधिकारी अभियंता धानोकार यांना विचारणा केली असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे पोपटखेडच्या धरणातील पाणीसाठय़ाबद्दल व आतमधील गेटजवळ होत असलेल्या जेवणावळीच्या प्रकाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.