मुष्टीयुद्ध स्पर्धेत दीक्षा, आर्या, सिद्धी विजयी
By Admin | Updated: November 23, 2014 23:44 IST2014-11-23T23:44:18+5:302014-11-23T23:44:18+5:30
अकोला जिल्हास्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धा.

मुष्टीयुद्ध स्पर्धेत दीक्षा, आर्या, सिद्धी विजयी
अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे सुरू असलेल्या १६ वी जिल्हास्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत मुलींच्या गटातील लढती रविवार, २३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आल्या. सायंकाळी झालेल्या लढतींमध्ये विविध वजनगटात दीक्षा जारवाल, आर्या घनफोडे, पूर्वजा देशमुख, दीक्षा गवई, सिद्धी ढवळे, श्वेता बागडे, प्रियंका पवार, आर्या गंगाखेडकर, विधी रावल, धनश्री गायकवाड आदींनी विजय मिळविला. मुलांच्या गटात श्याम टोपले, प्रज्वल डोंगरे, अजहर अली, हरिवंश टावरी, राहुल राऊत, सचिन चौहान, करण कळमकर, शुभम चौधरी, सनी विदळे, दीपक यादव, अभय सोनोने, शुभम वाघ आदींनी विजय मिळविला. महानगर बॉक्सिंग असोसिएशनच्यावतीने आयोजित या स्पर्धेत जिल्हा प्रशिक्षण केंद्र, प्रभात किडस्, एमराल्ड क्लब, बीकेव्ही, क्रीडा प्रबोधिनी, स्टार क्लब, अकोला बॉक्सिंग क्लब आदी संघ सहभागी झाले आहेत.