दिग्रस बु. येथील विद्युत रोहित्रात बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:25 IST2020-12-30T04:25:24+5:302020-12-30T04:25:24+5:30

दिग्रस बु : पातूर तालुक्यातील सस्ती विद्युत उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या दिग्रस बु. येथे वाॅर्ड क्रमांक एकमधील बसस्थानक ते गाव ...

Digras Bu. Power outage here | दिग्रस बु. येथील विद्युत रोहित्रात बिघाड

दिग्रस बु. येथील विद्युत रोहित्रात बिघाड

दिग्रस बु : पातूर तालुक्यातील सस्ती विद्युत उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या दिग्रस बु. येथे वाॅर्ड क्रमांक एकमधील बसस्थानक ते गाव रस्त्यावरील विद्युत रोहित्रत वारंवार बिघाड होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या रोहित्रात तीन फ्यूज असून, यामधील दोन फ्यूज साेमवारी रात्री निकामी झाल्यामुळे ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागली.

रोहित्रावर विद्युतचा अतिभार झाला की, अचानक वीजपुरवठा खंडित हाेताे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच विद्युत रोहित्रामध्ये सोमवारी मध्यरात्री फ्यूज निकामी झाल्याने ग्रामस्थ रात्रभर अंधारात होते. तरी सबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन या ठिकाणी चांगल्या दर्जाचे फ्यूज लावण्याची मागणी, अशी मागणी मनोज गवई, प्रतीक गवई, धीरज गवई, प्रवीण इंगळे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

..............................

दिग्रस बु. येथील विद्युत रोहित्रावर विद्युतचा अतिभार हाेत असून, या रोहित्रात उत्तम दर्जाचे फ्यूज टाकावे जेणेकरून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणार नाही.

सुदर्शन गवई, दिग्रस बु.

Web Title: Digras Bu. Power outage here