दिग्रस बु. - दिग्रस खु. रस्त्याचे काम संथगतीने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST2021-05-15T04:17:20+5:302021-05-15T04:17:20+5:30
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. - दिग्रस खुर्द या मुख्य रस्त्याचे काम गत दोन वर्षांपासून संथगतीने ...

दिग्रस बु. - दिग्रस खु. रस्त्याचे काम संथगतीने!
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. - दिग्रस खुर्द या मुख्य रस्त्याचे काम गत दोन वर्षांपासून संथगतीने सुरू असून, ग्रामस्थांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पुढील महिन्यात पावसाळा सुरू होणार असून, या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यावर जाड प्रमाणात मोठी खडी टाकलेली असल्याने ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दिग्रस बु. येथील बसस्थानक-दिग्रस खुर्द बसस्थानकापर्यंत एकूण दोन ते अडीच किलोमीटरवर रस्ता तयार करणे सुरू आहे, परंतु या पुलाच्या दोन्ही बाजूने जाड प्रमाणाची खडी मागील कित्येक दिवसांपासून टाकलेली आहे. या खडीवरून वाहन घसरून खाली कोसळल्याच्या घटना घडत आहेत. तसेच येथील शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारा रस्ता कमी-जास्त झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होत आहे. रस्त्यावर मातीमिश्रित मुरूम टाकलेला असल्याने पावसाळ्यात चिखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
-------------
रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. रस्त्यावर मातीमिश्रित मुरूम टाकला असल्याने पावसाळ्यात अडचण होऊ शकते. त्यामुळे रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात यावे.
- जीवन उपर्वट, प्रहार सेवक, हिंगणा
-----------------------------------------------------
पिंपळखुटा-वाहाळा बु. रस्त्यावर खड्डेच खड्डे
वाहाळा बु : पातूर तालुक्यातील पिंपळखुटा-वाहाळा बु. मार्गावर खड्डेच खडे पडल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. गत दोन वर्षांपासून रस्त्यांची स्थिती जैसे थे असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांनी केली आहे. (फोटो)