शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गौण खनिज ‘रॉयल्टी’तून होणार जिल्ह्यात विकासकामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 1:16 PM

जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत जिल्ह्यात विविध विकासकामे करण्यात येण्यात येणार आहेत.

संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गौण खनिजाच्या स्वामित्वधन शुल्क (रॉयल्टी) सोबतच १० टक्के रकमेपोटी गत जुलै अखेरपर्यंत जिल्हा खनिकर्म विभागाकडे ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत जिल्ह्यात विविध विकासकामे करण्यात येण्यात येणार आहेत.वाळू घाट, खदानी (खनिपट्टे) इत्यादी गौण खनिजाच्या स्वामित्वधन शुल्काची (रॉयल्टी) शंभर टक्के रक्कम शासन खात्यात जमा करण्यात येते; तर ‘रॉयल्टी’ सोबतच प्राप्त होणारी १० टक्के रक्कम जिल्हा खनिकर्म विभागाकडे जमा करण्यात येते. त्यानुसार गत १ सप्टेंबर २०१६ ते जुलै २०१९ अखेरपर्यंत गौण खनिजाच्या ‘रॉयल्टी ’सोबतच १० टक्के रकमेपोटी ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा खनिकर्म विभागाकडे उपलब्ध झाला आहे. गौण खनिजाच्या ‘रायल्टी’सोबतच अतिरिक्त १० टक्के रकमेपोटी उपलब्ध या निधीतून जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत जिल्ह्यात विविध विकासकामे करण्यात येणार आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य सेवा, कौशल्य विकास, अपंग कल्याण, कृषी, स्वच्छता,भौतिक पायाभूत सुविधा इत्यादी प्रकारच्या विकासकामांचे नियोजन जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत करण्यात येणार असून, या विकासकामावर उपलब्ध निधी खर्च करण्यात येणार आहे.

कार्यकारी परिषद नियोजनास देणार मान्यता!जिल्हा खनिज प्रतिष्ठान कार्यकारी परिषदेची बैठक सोमवार, १९ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठान कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाºया या बैठकीत गौण खनिज ‘रॉयल्टी’सोबतच १० टक्के रकमेतून उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या नियोजनाला मान्यता देण्यात येणार आहे.

गौण खनिज स्वामित्वधन शुल्कासोबतच १० टक्के रकमेपोटी गत जुलै अखेरपर्यंत ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा खनिकर्म विभागाकडे उपलब्ध झाला. उपलब्ध यावर्षी जिल्ह्यातील विकासकामांवर खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान कार्यकारी परिषदेच्या बैठकीत विकासकामांच्या नियोजनाला मान्यता देण्यात येणार आहे.-डॉ. अतुल दोडजिल्हा खनिकर्म अधिकारी

टॅग्स :Akolaअकोला