शेतक-यांच्या प्रश्नांवर चळवळ उभारण्याचा निर्धार
By Admin | Updated: November 30, 2014 00:49 IST2014-11-30T00:49:47+5:302014-11-30T00:49:47+5:30
अकोला येथे ‘शेतकरी जागर मंच’ची स्थापना

शेतक-यांच्या प्रश्नांवर चळवळ उभारण्याचा निर्धार
अकोला: दुष्काळी परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर शनिवारी अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांच्या बैठकीत ह्यशेतकरी जागर मंचह्णची स्थापना करण्यात आली. शेतकर्यांच्या विविध समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यात चळवळ उभारण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांच्या विविध समस्यांच्या निवारणाच्या विषयावर जिल्ह्यातील शेतकर्यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत दुष्काळी परिस्थिती, शेतकर्यांच्या समस्या आणि प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच शेतकर्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी ह्यशेतकरी जागर मंचह्णची स्थापना करण्यात आली. दुष्काळग्रस्त शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यात चळवळ उभारण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला मनोज तायडे, जगदीश मुरुमकार, प्रशांत गावंडे, कृष्णराव देशमुख, शिवाजीराव म्हैसने, सतीश देशमुख व इतर शेतकरी उपस्थित होते.