घर जाळणारा प्रियकर कोठडीत

By Admin | Updated: March 24, 2017 02:17 IST2017-03-24T02:17:10+5:302017-03-24T02:17:10+5:30

रामदासपेठ पोलिसांनी प्रियकराला अटक केली.

Detective lover in house | घर जाळणारा प्रियकर कोठडीत

घर जाळणारा प्रियकर कोठडीत

अकोला: युवकाने पत्नीसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याची माहिती मिळाल्याने पतीने पत्नीची रवानगी माहेरला केली. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने तिच्या घरी जाऊन तिच्या घरामध्ये रॉकेल व पेट्रोल टाकून साहित्य जाळून टाकल्याची घटना ११ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी प्रियकराला अटक केली. त्याला गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये संदीप भगवान पट्टेबहादूर (२८ रा. बिर्ला रेल्वे कॉलनी) याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची कुणकुण तिच्या पतीला लागली. उगाच समाजात बदनामी नको म्हणून पतीने पत्नीला माहेरी पाठवून दिले. यामुळे पत्नीचा प्रियकर चिडला आणि त्याने ११ मार्च रोजी दुपारी ह्यत्याह्ण महिलेच्या घरात जाऊन तिच्या घरात रॉकेल, पेट्रोल टाकून घरातील साहित्य जाळून टाकले. याप्रकरणी संदीप भगवान पट्टेबहादूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संदीप पट्टेबहादूरला अटक केली.

Web Title: Detective lover in house