मोर्णेच्या नशिबी वनवास

By Admin | Updated: December 11, 2014 01:04 IST2014-12-11T01:04:01+5:302014-12-11T01:04:01+5:30

जलप्रदूषण : पुनरूज्जीवनासाठी हवा पुढाकार.

Destruction of Morane | मोर्णेच्या नशिबी वनवास

मोर्णेच्या नशिबी वनवास

डॉ. किरण वाघमारे / अकोला
अकोला जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकाची नदी म्हणून मोर्णा नदी सुपरिचित आहे. दोन जिल्ह्यातून वाहणारी ही नदी कधीकाळी अकोलेकरांची जीवनदायिनी होती; परंतु आज ही नदी एका मोठय़ा नाल्यात रूपांतरित झाली आहे. मोर्णा नदीतील वाढलेले जलप्रदूषण अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा ठरू पाहत आहे. गंगा नदीच्या धर्तीवर मोर्णेचेही पुनरुज्जीवन केले जाणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
अकोला शहराला दोन भागात विभागणारी मोर्णा नदी कधीकाळी या शहराचे वैभव होते. ज्या गावात नदी असते तिथे संपन्नता नांदते, असे म्हटले जाते. त्यानुसार मोर्णा नदी वाहती होती, त्यावेळी अकोल्यात संपन्नता होती. १९८५ च्या काळात पाराशर यांनी अकोल्याला वैभव प्राप्त करून दिले. त्यांच्या निधनानंतर या शहराला उतरती कळा लागली. मोर्णेचीदेखील अवस्था अशीच बिघडत गेली. मोर्णेची जसजशी दुरवस्था होत होती, तशी अकोल्याचीदेखील दुर्गती होत गेली. मोर्णा आटली आणि अकोल्याचा विकासही खुंटला. कधीकाळी अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब असलेली मोर्णा नदी आज त्यांच्यासाठी लज्जास्पद बनली आहे. मोर्णा नदीच्या सुंदर काठावर फिरायला जाणारे अकोलेकर आता मोर्णकडे ढुंकून पाहायलादेखील तयार नाहीत.
मोर्णा नदी अकोलेकरांची जीवनदायिनी होती. मोर्णा नदीतील पाण्याचे शुद्धीकरण कौलखेड येथील पंपहाऊसवर करून पुढे हे पाणी नेहरू पार्कस्थित पाण्याच्या टाकीत आणल्या जात होते आणि मग तिथून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जात होता. आज मात्र कौलखेडस्थित पंपहाऊस अडगळीत पडले आहे.

Web Title: Destruction of Morane