निकालाची उत्कंठा शिगेला
By Admin | Updated: May 12, 2014 00:30 IST2014-05-12T00:25:28+5:302014-05-12T00:30:38+5:30
मतमोजणी पाच दिवसांवर

निकालाची उत्कंठा शिगेला
अकोला : लोकसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवार, १६ मे रोजी जाहीर होणार आहे. मतमोजणी पाच दिवसांवर येऊन ठेपल्याच्या पृष्ठभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालात कोण बाजी मारणार, याबाबत मतदारांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या १0 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत भाजपचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, भारिप-बमसंचे अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह सात उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) सीलबंद झाले. मतपेट्या अकोल्यातील मंगरुळपीर रोडवरील खदानस्थित शासकीय धान्य गोदाम येथील ह्यस्ट्राँग रूमह्णमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे. त्यामध्ये गेल्या महिनाभरापासून ह्यईव्हीएम मशीनह्णमध्ये सीलबंद झालेल्या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. निवडणुकीचा निकाल केवळ पाच दिवसांवर येऊन ठेपल्याच्या स्थितीत अकोला लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार, याबाबत मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदारसंघात सात उमेदवार भाग्य अजमावित असले तरी, प्रामुख्याने भाजप, काँग्रेस व भारिप-बमसं या तीन पक्षांच्या उमेदवारांमध्येच काट्याची लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते आणि कोण बाजीगर ठरतो, याबाबतच्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या निकालाबाबत गल्लोगल्ली होणार्या चर्चांमध्ये दावे-प्रतिदावे आणि वेगवेळ्या अंदाजांचा खल पडताना दिसत आहे.