अकोट फैल परिसरातील आपातापा चौकात एक इसम कमरेला पिस्टल लावून येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांना मिळाली. या माहितीच्या आधारे एक पथक पाठवून सदर ठिकाणी सापळा लावला असता साधना चौक येथील रहिवासी आरोपी शेख यासीम शेख नाझीम कमरेला पिस्टल लावून फिरत असताना आढळला. पोलिसांनी शिताफीने सदर आरोपीस अटक केली असून त्याच्या जवळून एक देशी बनावटीची पिस्टल व एक जिवंत कडतूस असा एकूण २६ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षिका मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनात नितीन सुशिर, हरिश्चंद्र दाते, सुनील टोपकर, संजय पांडे, श्रीकांत पवार, अस्लम शहा, श्याम आठवे, प्रशांत इंगळे, राहुल चव्हाण, दिलीप इंगोले यांनी केली.
देशी कट्टा, काडतुसासह एका आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:20 IST